पुण्यात ड्रोनच्या घिरट्या थांबायचं नाव घेईनात; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Pune News | राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ड्रोनचे (Pune News Drone) सावट दिसून येत आहे. ड्रोनचा सर्वाधिक वापर हा एखाद्या कार्यक्रमात करताना पाहिला असेल. तसेच एखाद्या लग्नसमारंभात किंवा क्रिकेट स्पर्धांमध्ये किंवा अन्य ठिकाणी आपण ड्रोनचा वापर केला असल्याचं पाहिलं आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पुणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये रात्रीच्या वेळेला ड्रोनच्या घिरट्या दिसून येत आहेत.

पुणे जिल्ह्यात ड्रोनचं सावट

पुणे जिल्ह्यातील बारामती, मुळशी, भोर, वेल्हा, दौंड, इंदापूर येथे रात्री ड्रोन (Pune News Drone) फिरत आहेत. तसेच आंबेगाव, शिरूर याठिकाणी देखील हीच परिस्थिती असल्याचं दिसून आलं आहे. मात्र हे ड्रोन उडवून नेमकं काय करत आहेत? हे ड्रोन नेमकं कोण उडवत आहेत? यामागील नेमकं कारण अद्यापही समोर आलं नाही. त्यामागील नेमका काय हेतू होता हे देखील अद्यापही समोर आलेलं नाही. (Pune News Drone)

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुळशी येथील भरे आणि बारामती तालुक्यातील माळेगाव येथे ड्रोनच्या घिरट्या सुरू होत्या. त्यावेळी ते ड्रोन एकाच्या घरावर आणि शेतात पडल्याने भीतीचे वातावरण होते. मात्र हा ड्रोन कोणाचा होता? हा ड्रोन कशासाठी उडवण्यात येत होता? याचा तपास अद्यापही लागलेला नाही. चोरीच्या उद्देशाने तर ड्रोनच्या माध्यमातून टेहाळणी केली जात नाही ना? असे अनेक सवाल उपस्थित होताना दिसत आहेत.  मात्र अद्यापही चोरीची कोणतीही घटना घडली नसल्याचं दिसून आलं आहे. (Pune News Drone)

यामुळे ड्रोन घिरट्या घेत असलेल्या ठिकाणी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून त्यांनी पोलिसांशी संपर्क केला. तेव्हा पुणे पोलिसांनी याप्रकरणात लक्ष घातलं. ड्रोन पाडण्यासाठी पोलिसांनी जॅमर लावले होते. त्यानंतर ड्रोनच्या घिरट्या बंद झाल्या. मात्र आता या घिरट्या महाराष्ट्रातील इतर भागातही दिसून येत आहेत.

ड्रोनबाबत अद्यापही कोणतीही माहिती नाही

ड्रोन रात्रीच्या वेळी गावांमध्ये जात आहे. तो तिथून नेमकी कोणती माहिती मिळवायचं काम करत आहे? हा ड्रोन कोण उडवत आहे? यामुळे अनुचित घटना तर घडत नाही ना? असे अनेक सवाला पुण्यासह राज्यातील नागरिकांमध्ये उपस्थित होताना दिसत आहेत.

News Title – Pune News Drone Flying In Dark Night Marathi News

महत्त्वाच्या बातम्या

ऐकावं ते नवलंच! पीएम आवास योजनेचे पैसे मिळताच 11 महिला बॉयफ्रेंडसोबत झाल्या फरार, पती मात्र..

सावधान! पुढील तीन दिवस ‘या’ भागात दमदार पाऊस पडण्याची शक्यता

मोठी बातमी! ठाण्यात स्वाईन फ्ल्यूचा शिरकाव, रूग्णांची संख्या आली समोर

इंडियन बँकेत होतेय तब्बल 1500 पदांसाठी भरती; ‘इथे’ करा अर्ज

‘अशा’ लोकांपासून चार हात दूरच राहा नाहीतर भिकेला लागाल!