पुण्यासह नगरच्या काही भागांवर रात्री ड्रोनच्या घिरट्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Pune News | खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात अंधाऱ्या रात्रीत ड्रोन फिरत असल्याचं दिसून आलंय. एकाच परिसरामध्ये तीन  ते चार ड्रोन फिरताना दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निघोज, शिरापूर देवीभोयरे तसेच टाकळी हाजी, शिरुर परिसरात ड्रोन सदृष उपकरणे आकाशात रात्री दहा ते एक वाजेपर्यंत गेली चार दिवसांपासून घिरट्या घालत असल्याचं नागरिकांनी म्हटलंय.

ही सर्व उपकरणे निघोज तसेच शेजारील गावातून येत असल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही महिन्यांपुर्वी खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये मध्यरात्री ड्रोन फिरत होते. त्यानंतर आठ दिवसांपूर्वी दौंड तालुक्यात ड्रोन फिरत असल्याचं दिसून आलं. आता शिरूरमध्येही हीच घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

पुण्यासह नगरच्या काही भागांमध्ये ‘ड्रोन’ची दहशत

यापूर्वी साबळेवाडी, बहुळ, कोयाळी – भानोबाची, सिद्धेगव्हाण, चिंचोशी, मोहितेवाडी, वडगाव – घेनंद, शेलपिंपळगाव, शेलगाव या गावांमध्ये दिवसा पाळत ठेवून रात्रीच्या वेळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. बहुळ परिसरात देखील चोरीची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे स्थानिकांमध्ये सध्या भीतीसदृश वातावरण निर्माण झाले आहे.

रात्री चार ते पाच ड्रोन परिसरात घिरट्या घालत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी हे ड्रोन का फिरत असतील?, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. त्यातच (Pune News) चोरीच्याही घटना घडल्याने हे सर्व चोरीसाठी तर नाही न केलं जात?, असाही संशय नागरिक व्यक्त करत आहेत.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सोशल मीडियावर देखील ड्रोनचा व्हिडीओ व्हायरल होत असून सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले जात आहे. बऱ्याच ठिकाणी गावातील तरुणांनी सोशल मीडियावर ब्रॉडकास्ट ग्रुप बनवून त्या माध्यमातून सर्वांना अलर्ट करण्याचे काम केले जात आहे.

या प्रकरणी आता नगरिकांनी पोलिसांकडून रात्रीच्या वेळी परिसरात गस्त घालण्याची मागणी केली जात आहे. वाढत्या चोरीच्या प्रकारांमुळे नागरिकांकडून ही मागणी केली जातेय. पुण्यासह नगरच्या (Pune News) काही भागांमध्ये सध्या ‘ड्रोन’ची दहशत पसरली आहे.सध्या पोलिस हे ड्रोन का फिरतात, याचा शोध घेत असून नागरिकांनी घाबरू नये, असं आवाहन करण्यात आलंय.

News Title – Pune News Drones hovering at night in Pune and nagar

महत्वाच्या बातम्या –

“अजित पवारांची ओरिजनल राष्ट्रवादी”, सुनील तटकरेंच्या विधानावर शरद पवार म्हणाले…

T20 World Cup फायनल आधी टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर!

सरकारी नोकरीची संधी! ‘या’ विभागात भरती प्रक्रिया सुरु

गुड न्यूज! ‘या’ शहरांत पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

ग्राहकांना झटका! महिन्याच्या शेवटी सोनं महागलं; जाणून घ्या आजचे दर