मद्यधुंद अवस्थेत भररस्त्यात लघुशंका, पुण्यात श्रीमंत बापाच्या पोराचा माज; नागरिक संतप्त

Pune News Drunk Youth Misbehave on Road 

Pune News | पुण्यातील शास्त्रीनगर चौकात (Shastri Nagar Chowk) मद्यधुंद अवस्थेत BMW कारमधून आलेल्या तरुणांनी भररस्त्यात लघुशंका केली आणि नागरिकांना अश्लील हावभाव करत धक्कादायक कृत्य केले. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.

शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare), शिवसेना (शिंदे गट) नेत्या निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Ajit Pawar गट) नेत्या रूपाली ठोंबरे (Rupali Thombre) यांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Pune News )

पुण्यात मद्यधुंद BMW चालकाचे अश्लील कृत्य

शनिवारी सकाळी पुणे नगर रोडवरील शास्त्रीनगर चौकात मद्यधुंद अवस्थेतील BMW चालक आणि त्याच्या मित्राने गाडी रस्त्याच्या मधोमध उभी करून लघुशंका केली. एका नागरिकाने याला विरोध केला असता, या तरुणाने अश्लील हावभाव करत गाडी वेगाने पुढे नेली. हा प्रकार जागतिक महिला दिनी घडल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आरोपींना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक नागरिक आणि राजकीय नेत्यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला असून, पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

राजकीय नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

रूपाली ठोंबरे: “व्हिडिओ काढण्यापेक्षा नागरिकांनी पोलिसांना बोलवले पाहिजे. अशा विकृत लोकांना ठेचून काढले पाहिजे.”, असं रूपाली ठोंबरे म्हणाल्या.

सुषमा अंधारे: “पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मागील घटनांमधूनही पोलिसांनी काही धडा घेतलेला नाही.”, असा संताप अंधारे यांनी व्यक्त केला.

निलम गोऱ्हे: “या गुन्हेगारांना कायद्याचा धाक वाटत नाही. पोलिसांनी कठोर कारवाई करून या प्रवृत्तीला आळा घालावा.”, अशी मागणी गोऱ्हे यांनी केली

Title : Pune News Drunk Youth Misbehave on Road 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .