Pune News | पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर बुरुंजवाडी येथील निवासस्थानावर ‘ईडी’ने छापेमारी केली आहे. मंगळवारी सकाळी सात वाजता ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी बांदल यांच्या निवासस्थानावर छापे मारले.
कारवाईच्यावेळी मंगलदास बांदल हे आपल्या मोहम्मद वाडी पुणे (Pune News) येथील निवासस्थानी होते. तर शिक्रापूर येथील निवासस्थानी त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल तसेच बांदल यांचे भाऊ आहेत.
बड्या नेत्याच्या घरावर ईडीचे छापे
‘मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ‘ईडी’ने ही कारवाई केली असून कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. बांदल यांच्याशी संबंधित बँकेची लॉकरही अधिकाऱ्यांनी तपासून पाहिलं आहे.
बांदल हे शिवाजीराव भोसले सहकारी बँक प्रकरणातील आरोपी आहेत. बराच काळ ते तुरुंगात होते, सध्या जामिनावर बाहेर आहेत. ईडीची ही दुसरी कारवाई बांदल यांच्यावर होत आहे.
Pune News | मंगलदस बांदल विधानसभेसाठी इच्छुक
शिरूर-हवेली विधानसभा लढवण्यासाठी सध्या ते इच्छुक आहे. लोकसभा निवडणुकीत मंगलदास बांदल यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली होती. मात्र बांदल यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी बांदल यांची उमेदवारी रद्द केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
राज ठाकरेंच्या महाराष्ट्र सैनिकांना थेट सूचना, म्हणाले… ‘आरोपीला…’
केकेआरचा तुफानी फलंदाज आरसीबीमध्ये जाणार? काय आहे यामागचं कारण
वरुण ‘यू लव्ह आय’; पण मला मुली आवडत नाहीत?
बदलापूर अत्याचार प्रकरणी सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय!
पुढील काही तास धोक्याचे! ‘या’ जिल्ह्यांना IMD कडून यलो अलर्ट जारी