मोठी बातमी! एकाच दिवशी 5 बलात्काराच्या घटनेनं पुणे हादरलं

Pune News | पुण्यात सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसत आहे. कोयता गँगची दहशत त्यानंतर छोट्या गोष्टींमुळे मोठे गुन्हे घडत आहेत. एवढंच नाहीतर गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात महिला असुरक्षित असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हे वाढत चालले आहेत. त्यामुळे शहरातील तरुणी आणि महिला यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होताना दिसत आहे. सध्या पुण्यातून अणखी एक धकादायक माहिती समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

शिक्षणाचं माहेर घर (Pune News) असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढताना दिसत आहे. पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे ज्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. पुण्यात एकाच दिवशी बलात्काराच्या 5 घटना घडल्या.

लग्नाचं आमिष, सोशल मीडियावरील ओळख, अपहरण आणि जीवे मारण्याची धमकी देत या 5 बलात्काराचा घटना घडल्या आहेत. या प्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशन, लोणिकंद पोलीस स्टेशन, कोंढवा पोलीस स्टेशन, स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

घडलेल्या 5 घटना-

समोर आलेल्या माहितीनूसार (Pune News) पहिल्या घटनेत कोल्हपूरच्या 34 वर्षीय महिलेला लग्नाचं अमिष दाखून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार घडला. दुसऱ्या घटनेत 22 वर्षीय तरुणीला लग्नाचं अमिष दाखवून जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला.

तिसऱ्या घटनेत विवाहित महिलेच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तर चौथ्या घटनेत सोशल मीडियावर ओळख करत अल्पवयीन मुलीशी संबंध ठेवून नातेवाईकांच्या घरी जाऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पाचव्या घटनेत अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिला गोव्याला नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

News Title : pune news five rape case in a day

महत्त्वाच्या बातम्या-

दोन आमदारांचे राजीनामे, आणखी चार आमदार राजीनामे देण्याच्या तयारीत

‘एक जण राजीनामा देतोय तर त्याचा…’; केतकी चितळेनं काढलं महायुती सरकारचं वाभाडं

कंगनाला कानाखाली मारल्याच्या घटनेवर अखेर करणने दिली प्रतिक्रिया, म्हणाला…

“जनतेच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल राग, लोक आता मनसेची वाट बघतायेत”

नवरा मैत्रिणीसोबत करत होता रोमान्स, तेवढ्यात बायकोने पाहिलं अन्…;संभाजीनगर हादरलं