वाहन चालकांसाठी खुशखबर!, पोलिसांनी रस्त्यात अडवलं तरी आता टेन्शन नाही

Pune News Forgot License RC Show Digilocker

Pune News | वाहनचालकांसाठी एक आनंदाची बतमी समोर आली आहे. आता वाहन कागदपत्रांच्या पडताळणीदरम्यान (Verification) लायसन्स (License) किंवा वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी- RC) घरी विसरल्यास, घाबरून जाण्याचे कारण नाही. तुम्ही ‘डिजिलॉकर’ (DigiLocker) अॅपमध्ये सेव्ह केलेल्या या कागदपत्रांची डिजिटल प्रत दाखवू शकता. देशभरात या डिजिटल कागदपत्रांना मान्यता असल्याने, वाहतूक पोलीसही (Traffic Police) तुम्हाला योग्य ते सहकार्य करतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. (Pune News )

‘डिजिलॉकर’मध्ये हे कागदपत्र ठेवा सेव्ह:

-वाहन चालविण्याचा परवाना (Driving License)
-वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी – RC)
-विमा प्रमाणपत्र (Insurance Certificate)
-फिटनेस प्रमाणपत्र (Fitness Certificate)
-उत्सर्जन चाचणी प्रमाणपत्र (PUC Certificate)

वाहन चालकांनो, असा घ्या या सुविधेचा लाभ:

१. सर्वप्रथम, ‘डिजिलॉकर’ अॅप डाउनलोड करा आणि नोंदणी करत रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्रालयाच्या (Ministry of Road Transport and Highways) होमपेजवरून ड्रायव्हिंग लायसन्स निवडा. (Pune News )

२. तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाका आणि अॅप तुमच्या परवान्याची पीडीएफ कॉपी तयार करेल. ती कॉपी वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला दाखवा.

वाहन चालवताना तुम्ही लायसन्सची भौतिक किंवा इलेक्ट्रॉनिक प्रत सादर करू न शकल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. तसेच तुमच्याकडे जर परवानाच नसेल तर तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो. तसेच अधिकारी तुमचे वाहनही जप्त करू शकतात.

कागदपत्र नाकारल्यास तक्रार दाखल करा

पोलिस कर्मचाऱ्याने ‘डिजिलॉकर’मधील कागदपत्र नाकारल्यास त्याच्या वरिष्ठांशी बोला, त्यांनी न ऐकल्यास पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा. माहिती तंत्रज्ञान कायदा २००९ (Information Technology Act 2009) हा ‘डिजिलॉकर’वरील इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मूळ कागदपत्रांच्या समतुल्य मानतो. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयही (Ministry of Road Transport and Highways) त्याला परवानगी देते. त्यामुळे वाहतूक पोलीस ही कागदपत्रे नाकारू शकत नाहीत, असे पोलिसांनी सांगितले.

डिजिटल दस्तऐवजांचा वापर केल्याने मूळ कागदपत्रे सुरक्षित राहतात. त्यामुळे बनावट कागदपत्रांपासूनही बचाव होतो. ‘डिजिलॉकर’ आणि ‘एम परिवहन’ (mParivahan) अशा अधिकृत अॅपमधून कागदपत्रांचे डिजिटल स्वरूप कायदेशीर मानले जाते. (Pune News )

Title: Pune News Forgot License RC Show Digilocker

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .