पुणे मनोरंजन

पुण्यातील व्हायरल मोलकरीणबाईंना रातोरात मिळाल्या हजारो कामाच्या ऑफर! पहा कशा…

पुणे | कामाची गरज आहे म्हणून व्हिजिटिंग कार्ड काढलेल्या गीता काळे मावशींना सोशल मीडियाने जगभरात पोहोचवलं आहे. व्हिजिटिंग कार्डमुळे या मावशी रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आल्या  आणि त्यांची हातची जाणारी दोन कामंही त्यामुळे वाचली आहेत.

मी अस्वस्थ होते. धनश्री शिंदे मॅडम यांच्या घरी काम करताना त्यांना मी माझी अडचण सांगितली. त्यानंतर धनश्री मॅडम यांनी माझ्यासाठी एक व्हिजिटिंग कार्ड तयार केले. त्यांनीच व्हिजिटिंग कार्ड सोशल मीडियावर शेअर केलं, असं गीता काळे यांनी संगितलं आहे.

दर मिनिटाला वाजणारा फोन घेऊन हैराण झालेल्या गीता काळे यांनी अखेर फोन बंद ठेवला आहे. बावधनमध्ये राहणाऱ्या काम मिळवण्यासाठी उठाठेव केली खरी पण आता त्यांना मुंबई, पुण्यातून नव्हे तर  राजस्थान, हरियाणा, दिल्ली आणि गुजरात अशी विवध भागातून फोन येऊ लागले आहेत.

काही दिवसांपासून गीतामावशी तणावाखाली होत्या. तणावाचे कारण विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की, माझं दोन घरांचं काम जाणार असून घर सांभाळणे अवघड होणार आहे. यावर काही वेळ विचार करून मी ऑनलाईन व्हिजिटिंग कार्ड तयार केले, असं व्हिजिटिंग कार्ड तयार करणाऱ्या धनश्री शिंदे यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या