कोथरूडमध्ये राडा! मुरलीधर मोहोळांच्या माणसाला गजा मारणे टोळीतील गुंडाकडून मारहाण

Pune News Gajanan Marne Gang Attacks Devendra Jog Close Aide of Minister Muralidhar Mohol

Pune News | पुण्यातील कोथरूड (Kothrud) भागात शिवजयंतीच्या दिवशी (19 फेब्रुवारी) गजानन मारणे (Gajanan Marne) टोळीतील गुंडांनी केंद्रीय नागरी उद्यान मंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या निकटवर्तीय देवेंद्र जोग (Devendra Jog) यांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाईकला धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि गुंडांनी जोग यांना गंभीर जखमी केले. (Pune News)

गजानन मारणेच्या भाच्यासह चौघांनी केली मारहाण

या हल्ल्यामध्ये बाबू पवार (Babu Pawar), किरण पडवळ (Kiran Padwal), ओम तीर्थराम (Om Teerthram) आणि अमोल तापकीर (Amol Tapkir) या चौघांचा समावेश होता. बाबू पवार हा कुख्यात गुंड गजानन मारणे याचा भाचा आहे.

घटनास्थळी काय घडले?

शिवजयंतीच्या दिवशी कोथरूड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मिरवणूक सुरू असताना, चार जण दुचाकीवर जात असलेल्या देवेंद्र जोग यांना कट मारला. रागाने पाहिल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला, आणि चारही जणांनी मिळून जोग यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. नाकावर जोरदार ठोसा मारण्यात आला, त्यानंतर रस्त्यावर पाडून लाथा-बुक्क्यांनी आणि कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

मोहोळ यांनी व्हिडीओ कॉलवर विचारपूस केली

घटनेची माहिती मिळताच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्हिडीओ कॉलद्वारे देवेंद्र जोग यांची प्रकृतीची विचारपूस केली. जोग हे मोहोळ यांच्या संपर्क कार्यालयात सोशल मीडिया कॅम्पेनिंगचे काम करतात. कोथरूड पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून, गुंड गजानन मारणेचा भाचा बाबू पवार फरार आहे. या हल्ल्याच्या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) भादंवि कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल विनायक तापकीर (Amol Vinayak Tapkir)
ओम तीर्थराम धर्म जिज्ञासू (Om Teerthram Dharam Jigyasu)
किरण कोंडीबा पडवळ (Kiran Kondiba Padwal)
बाबू पवार (Babu Pawar – गजानन मारणेचा भाचा) (फरार) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कोथरूड परिसरात भीतीचे वातावरण

या घटनेमुळे कोथरूड परिसरात तणावाचे वातावरण आहे. गजानन मारणे टोळीच्या गुंडांनी दिवसाढवळ्या मारहाण केल्याने पोलिसांवरील दबाव वाढला आहे. सध्या पोलिसांचा फरार आरोपी बाबू पवारच्या शोधासाठी विशेष पथक रचण्यात आले आहे. या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर गजानन मारणे टोळीवर कायदेशीर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Pune News)

Title : Pune News Gajanan Marne Gang Attacks Devendra Jog Close Aide of Minister Muralidhar Mohol 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .