Pune News Gajanan Marne | पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा होत आहे. गेल्या काही महिन्यांआधी पुणे पोलिसांनी पुण्यातील गुंडांची परेड घेतली होती. त्यांना बजावलं देखील होतं. मात्र आता त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचं चित्र समोर आलं आहे. कारण आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या आदेशाला आता केराची टोपली दाखवली आहे. (Pune News Gajanan Marne)
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
कुख्यात गुंड गजानन मारणे यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. गजानन मारणेच्या टोळक्याने विनानंबर प्लेटच्या गाड्या फिरवल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या याची चर्चा सुरू आहे. व्हिडीओमध्ये कुख्यात गुंड गजानन मारणे हा गाड्यांच्या समोर नारळ फोडताना दिसत आहे. (Pune News Gajanan Marne)
आयुक्तांच्या आदेशाला फाट्यावर मारलं
गेल्या काही महिन्यांआधी पुणे पोलिसांनी व्हिडीओचं उदत्तीकरण करण्यावरून बजावलं होतं. सोशल मीडियावर कोणीही व्हिडीओ, रिल्स शेअर करू नये. यामुळे पुणे शहराचं वातावरण हे बिघडलं असल्याचं पुणे पोलीस म्हणाले आहेत. मात्र आता व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले असून आयुक्तांच्या आदेशाला फाट्यावर मारल्याचं पाहायला मिळत आहे. (Pune News Gajanan Marne)
पुन्हा जैसे थे परिस्थिती कायम
गेल्या काही दिवसांआधी पुणे पोलिसांनी 267 गुन्हेगारांना आयुक्तालयात बोलावलं असून त्यांना समज दिला होता. मात्र काही दिवसानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती कायम पाहायला मिळत आहे. दरम्यान पुणे शहर हे विद्येचे माहेरघर असून पुण्यात गुन्हेगारीचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळालं आहे. (Pune News Gajanan Marne)
पुणे शहरात अल्पवयीन गुन्हेगार आहेत. अशातच कोयता गँगचा देखील पुणे शहरामध्ये सुळसुळाट असल्याचं आल्याचं पाहायला मिळतंय. एकतर्फी प्रेमातूनही अनेकदा जीवघेणे हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
News Title – Pune News Gajanan Marne Viral video
महत्त्वाच्या बातम्या
मोदी सरकार पुन्हा आल्यास ‘हे’ शेअर्स बनणार रॉकेट; पैसे होणार डबल
‘…म्हणून हिंदुंनी 5-5 मुलांना जन्म द्यायला हवा’; देवकीनंदन यांचं वक्तव्य चर्चेत
‘येत्या 4 जून रोजी…’; मनोज जरांगे यांची नवी घोषणा
‘…नाहीतर मी मुख्यमंत्री झालो असतो’; छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
पुणे हादरलं! बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षाच्या मुलाने भरधाव कारने दोघांना चिरडलं