Pune News | पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये हिट अँड रनचा प्रकार अजून सुरूच असल्याचं चित्र आहे. हे प्रकरण आता पुणे शहरामध्ये वाढत चाललं आहे. पोर्शे अपघाता प्रकरणी पुणे शहरातील वाहतुक व्यवस्था आणि कायदा, सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच नुकतेच खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने पुन्हा एकदा पोर्शे प्रकरणाची आठवण करून दिली आहे. मात्र आणखी एक धक्कायदायक घटना पुणे (Pune News) शहरात घडली आहे. ससून रूग्णालयातील डॉक्टरांनी तिघांना उडवले असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे शहरात हिट अँड रनने पुणेकर त्रस्त
पुणे शहरात हिट अँड रनचे प्रमाण अधिक वाढल्याने पुणेकर त्रस्त झाले आहेत. सातत्याने घडणाऱ्या घटनांनंतरही कोणतीही ठोस भूमिका पुणे पोलीस प्रशासन घेत नसल्याचं बोललं जात आहे. गजबजलेल्या वल्लभनगर स्थानकाजवळ हिट अँड रनचा प्रकार घडला आहे. मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचले नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. यामुळे आता पुन्हा एकदा पुणे पोलिसांचा बेसावधपणा उघडकीस आला आहे.
दरम्यान ससून रूग्णालयातील एका डॉक्टरांनी (Pune News )जोरदार धडक दिली. त्यामध्ये त्यांनी तिघांना उडवले. एकाने टपरीला जोराची धडक दिली आहे. एक व्यक्ती चाकाखाली फसली. या अपघातानंतर जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं. वाहन चालक असलेल्या डॉक्टरांना कोणतीही जखम झाली नाही.
भरधाव आलेल्या गाडीने मागून धडक दिली. गाडीचा स्पीड एवढा जास्त होता की रिक्षाला धडकल्यानंतर गाडीने एका टपरीला धडक दिली. गाडीच्या चाकाखली एका व्यक्तीचे डोके देखील आले होते. परंतु आसपासच्या लोकांनी गाड्या हलवल्या म्हणून जीवीतहानी झाली नाही. ज्या टपरीला धडक देण्यात आली तेव्हा तिथे महिला काम करत होत्या. त्यांच्या अंगावर तेल आणि गरम भाजी पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले.
पुणे शहरात अपघाताचं सत्र सुरूच
दरम्यान, पुणे शहरामध्ये अपघाताचं सत्र सुरू (Pune News ) असलेलं दिसून आलं आहे. पोर्शे अपघात प्रकरण नुकतच गाजलेलं आहे. त्यानंतर दोनच दिवसांपुर्वी दिलीप मोहिते पाटील या आमदाराच्या पुतण्याने पुन्हा पोर्शे अपघात प्रकरणाची प्रचिती आणली. तर आता मात्र ससून रूग्णालयातील डॉक्टरांनी तिघांना उडवले. मात्र यावर पोलीस काय करत आहेत? असा सवाल पुणेकर विचारत आहेत.