“पत्नीचा गळा आवळून खून केला, नंतर इलेक्ट्रिक शॉकने..”; धक्कादायक प्रकारामुळे पुणे हादरलं

telangna news

Pune News | पुणे (Pune News) येथील रांजणगाव येथून धक्कादायक घटना घडली आहे. ज्या व्यक्तीने पत्नीच्या खूनाबाबत फिर्याद नोंदवली आहे. तिच व्यक्ती खुनी निघाली असल्याचं दिसून आलं आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर पतीने पोलिस ठाण्यात जात फिर्याद नोंदवली. मात्र पोलीस शोध घेत असताना फिर्याद नोंदवणारा पती खुनी निघाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. (Pune News)

पतीनेच केला पत्नीचा खून

उच्चशिक्षित पतीने पत्नीचा गळा आवळून तिचा खून केला. तिच्या मृत्यूनंतरही तिला इलेक्ट्रिक शॉक देण्यात आलाय. या घडलेल्या घटनेने पोलिसांनी स्वप्नील रणपिसे (26) यांना ताब्यात घेतलं होतं. अशातच आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुण्यातील (Pune News) रांजणगाव सांडस येथे ही धक्कादायक घटना घडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शीतल रणपिसे (23) असे मृत महिलेचे नाव असून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. याप्रकरणी पोलीस ठाण्यात  खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी स्वप्नील उच्चशिक्षित आहे. सात महिन्यांपूर्वीच त्याचा शीतलशी विवाह झाला होता. तो संशयी असल्याने विवाहापूर्वी त्याने अनेक मुली पाहत असताना त्याने त्यांच्या भूतकाळाबाबत अनेक गोष्टी खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. (Pune News)

आरोपीच्या अशा स्वभावामुळे अनेक मुलींनी त्याला नकार दिला होता, असं पोलिसांनी सांगितलं होतं. अशात त्याचे आणि शीतलचे लग्न झाले होते. पण त्याचा संशयी स्वभाव गेला नाही. त्याने आपली पत्नी शीतलवर देखील संशय घेतला होता. ज्या दिवशी खुनाची घटना घडली, तेव्हा शीतल घरात एकटी होती. त्यावेळी घरातील सासू सासरे हे त्यांच्या कामानिमित्त बाहेर गेले होते.

त्यानंतर आरोपी स्वप्निलने आपल्या चुलत भावाला दरवाजा उघडून आत नेलं तेव्हा पत्नीचा मृतदेह पडला होता. तिच्या अंगठ्याला शॉक देण्यात आला. तिचा मृतदेह घेऊन ते रूग्णालयात घेऊन गेले होते. तेव्हा तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं.

आरोपी पतीने गुन्हा कबूल केला

यानंतर  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घरातील सामान हे अस्ताव्यस्त पडले होते. चोरी करणाऱ्यांनी शीतलचा खून केला असल्याचा अंदाज बांधण्यात आला होता. नवविवाहीतेचा खून झाल्या प्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी केली. यावेळी अनेक सीसीटीव्ही फूटेज तपासले. तसेच घरातल्यांचीही पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा पतीचं वागणं वेगळं दिसून आला. त्यावेळी पोलिसांना पतीवर संशय आला. अखेर त्यांनी त्याची चौकशी केली. तेव्हा त्याने गुन्हा कबूल केला.

News Title – Pune News Husband Killed His Wife

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात अतिवृष्टीचा हजारो शेतकऱ्यांना फटका; बळीराजा पुन्हा हवालदिल

अभिनेत्याची भरपावसात ड्युटी बजावणाऱ्या पोलिसांसोबत सेल्फी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

वसंत मोरेंवर उद्धव ठाकरे टाकणार ‘ही’ जबाबदारी?, लवकरच बांधणार शिवबंधन

शरद पवारांनी पहिला उमेदवार केला जाहीर; ‘हा’ 25 वर्षीय तरुण उतरणार रिंगणात

सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट जारी

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .