हिंजवडी ‘आयटी’त जरा जपून, ‘हा’ रस्ता प्रवाशांसाठी ठरतोय जीवघेणा

Pune News

Pune News | हिंजवडी आयटीपार्कचे (Hinjewadi IT Park) प्रवेशद्वार (Entrance) असलेला विनोदे वस्ती ते लक्ष्मी चौक (Vinode Vasti to Laxmi Chowk) रस्ता सद्यस्थितीत वाहनचालकांसाठी (Drivers), विशेषतः दुचाकीस्वारांसाठी (Two-Wheeler Riders) अत्यंत धोकादायक बनला आहे. या रस्त्यावर अपघातांचे (Accidents) प्रमाण वाढले असून, नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. (Pune News)

रस्त्याच्या दुरावस्थेबाबत (Poor Condition) अनेक तक्रारी करूनही एमआयडीसी (MIDC) विभाग आणि वाहतूक पोलिसांकडून (Traffic Police) दुर्लक्ष होत असल्याने ग्रामपंचायत (Grampanchayat) आक्रमक झाली आहे. रस्ता सुरक्षेच्या (Road Safety) उपाययोजनांसाठी (Measures) ग्रामपंचायतीने (Grampanchayat) एमआयडीसीला (MIDC) पत्र पाठवले आहे.

रस्त्याची दुरावस्था (Poor Condition); मृत्यूचे सापळे

विनोदे वस्ती ते लक्ष्मी चौक (Vinode Vasti to Laxmi Chowk) रस्त्यावर वाहने उभी केल्याने वाहतुकीस (Traffic) अडथळा निर्माण होतो. रस्ता प्रशस्त असला तरी अवजड वाहनांसह (Heavy Vehicles) इतर चारचाकी वाहने सुसाट वेगाने धावतात.

सद्यस्थितीत या रस्त्यावर लक्ष्मी चौक ते भूमकर चौकापर्यंत (Bhumkar Chowk) जागोजागी खड्ड्यांचे (Potholes) साम्राज्य पसरले आहे. खड्डे (Potholes) आकाराने मोठे आणि तुलनेत खोल असल्याने ते दुचाकीस्वारांसाठी (Two-Wheeler Riders) अक्षरशः मृत्यूचे सापळे बनले आहेत.

ग्रामपंचायतीचे (Grampanchayat) एमआयडीसीला (MIDC) पत्र

“रस्त्यावर कुठेही गतिरोधक (Speed Breakers) नाहीत, बाजु्पट्ट्या (Side Strips), झेब्रा क्रॉसिंगचा (Zebra Crossing) अभाव आहे. सूचना फलकांसह (Sign Boards) रस्ता सुरक्षेच्या (Road Safety) दृष्टीने तत्काळ पावले उचलणे गरजेचे आहे,” असे मत हिंजवडीचे (Hinjewadi) सरपंच गणेश जांभूळकर (Ganesh Jambhulkar) यांनी व्यक्त केले आहे.

“धोकादायक रस्त्याबाबत (Dangerous Road) नागरिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची संबंधित विभागाने (Department) गंभीर दखल घेणे अपेक्षित आहे, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला आहे. (Pune News)

अपघात (Accidents) आणि उपाययोजना

या रस्त्यावर आजपर्यंत अनेकांचा बळी गेला आहे. वाहतूक पोलीस (Traffic Police) आणि एमआयडीसी (MIDC) विभागाने गंभीर दखल घेत, रस्त्यावर आवश्यक त्या उपाययोजना (Measures) कराव्यात आणि रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशी मागणी हिंजवडी (Hinjewadi) ग्रामपंचायतीकडून (Grampanchayat) एमआयडीसी (MIDC) विभागाला करण्यात आली आहे.

बाजु्पट्ट्या (Side Strips) नसल्याने वाहने बेशिस्तपणे सुसाट धावत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना (Locals) तर रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरावा लागत आहे. यामुळे अनेक वेळा अपघात (Accidents) झाले आहेत. बाजु्पट्ट्या (Side Strips) नसल्याने वाहने घसरण्याचे प्रमाणही वाढले आहे. (Pune News)

Title : Pune News IT Hub Hinjewadis Dangerous Road Accidents on the Rise

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .