पुण्यात मोठ्या घडामोडी!; लोकसभेसाठी भाजपकडून ‘या’ बड्या नेत्याचं तिकीट फायनल?

Pune News | राज्यात सध्या पुणे लोकसभा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपनं मेधा कुलकर्णी यांना राज्यसभा दिल्याने आता लोकसभा उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार?, याची जोरदार चर्चा आहे. दिवसेंदिवस पुण्याच्या (Pune News) जागेबाबत नवीन गौप्यस्फोट समोर येत आहेत. त्यामुळे, पुणेकर मतदारांचं सुद्धा या घडामोडींकडे बारीक लक्ष आहे. आता काही नवीन घडामोडी समोर येत आहे. त्यातून भाजपचे शहराध्यक्ष राहिलेले, जगदीश मुळीक लोकसभेची उमेदवारी मिळवण्याच्या रेसमध्ये आघाडीवर असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. जगदीश मुळीक यांच्यात असं काय मॅजीक आहे?, ज्यामुळं आता त्यांच्या नावाची चर्चा पुणे लोकसभेसाठी होऊ लागली आहे, हेच आपण आजच्या व्हिडीओत पाहणार आहोत.

 

पुण्यातून कोण निवडूण येणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपला लोकसभेची एकूण एक जागा महत्त्वाची आहे. गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेली, पुणे लोकसभेची जागा त्यापैकीच एक मानली जाते. पुण्यात (Pune News) भाजपकडून दावेदार फार आहेत, मात्र निवडून कोण येणार?, यावरच तिकीट द्यावं लागणार आहे. त्यातही सध्या पुण्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती तसेच उमेदवारी वाटप करताना नेत्यांवर अन्याय होणार नाही, हे सुद्धा भाजपला पाहावं लागणार आहे. हे सगळं तुम्ही नीट ध्यानात घ्या, कारण काही इंटरेस्टिंग घडामोडी सुद्धा सध्या घडत आहेत आणि याचे धागेदोरे आपल्याला थेट या मतदारसंघात जोडून पाहावे लागणार आहेत.

सर्वात पहिला मुद्दा आहे मेधा कुलकर्णी यांना भाजपनं उमेदवारी का दिली? आणि त्यांच्या उमेदवारीनं लोकसभा उमेदवारीवर काय परिणाम होणार आहे?… मेधा कुलकर्णी कोथरुडमधून भाजपच्या आमदार होत्या, मात्र तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी, त्यांना आपली जागा सोडावी लागली होती. त्यानंतर त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना होती, त्यामुळं त्यांना राज्यसभा दिल्यानं हा अन्याय दूर झाल्याचं सांगितलं जातंय. मात्र आपल्याला फक्त एवढंच पाहून चालणार नाही, कारण या एका गोष्टीमुळं पुण्याच्या लोकसभा उमेदवारीची, सारी गणितंच बदलून गेली आहेत.

आता ब्राह्मण उमेदवाराचा पत्ता कट-

मेधा कुलकर्णी यांची राज्यसभा, ही पुण्यातील(Pune News) लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या दोन उमेदवारांना सेटबॅक देणारी ठरली आहे, त्यातलं पहिलं नाव आहे, सुनील देवधर यांचं… मेधा कुलकर्णी ब्राह्मण असल्यानं, आता भाजप लोकसभेला ब्राह्मण उमेदवार देण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे सुनील देवधर यांच्यासाठी हा मोठा सेटबॅक मानला जात आहे. देवधर यांना उमेदवारी दिली तर पुण्यात दोन-दोन ब्राह्मण खासदार होतील आणि पुण्यातील इतर समाजांना ते कितपत पचनी पडेल? हे सांगता येत नाही, त्यामुळे अशा परिस्थितीत पुन्हा ब्राह्मण उमेदवार देण्याची रिस्क भाजप घेणार नसल्याचं सांगितलं जातंय.

कोथरुडमधून दोन खासदार शक्यच नाही-

मेधा कुलकर्णींच्या उमेदवारीनं दुसरा सेटबॅक बसलाय, तो माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना… मेधा कुलकर्णी या कोथरुड भागाचं प्रतिनिधित्व करत होत्या आणि मुरलीधर मोहोळ सुद्धा याच भागातून येतात. त्यामुळं पुण्याच्या (Pune News) एकाच भागातून येणाऱ्या दोन नेत्यांना खासदारकीची संधी दिली जाईल का?, यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे. मोहोळ यांचा विचार करायचा झाला, तर पक्षानं त्यांना आतापर्यंत महापौरपद तसेच स्थायी समितीचं अध्यक्षपद दिलं आहे, त्यामुळं मोहोळ यांना लोकसभेचं तिकीट भेटण्याची शक्यता फारच कमी असल्याचं सांगितलं जातंय.

जगदीश मुळीक यांचं पारडं जड-

मेधा कुलकर्णी यांच्या उमेदवारीनं पुण्यातील दोन इच्छुकांच्या नावांची चर्चा थेट कमी झाली आहे. अशा परिस्थितीत भाजपकडे आता फक्त दोनच नावं उरली आहेत. एक म्हणजे जगदीश मुळीक आणि दुसरं म्हणजे संजय काकडे… यातील संजय काकडे यांच्या नावाची फारशी चर्चा नाही, मात्र जगदीश मुळीक यांच्या उमेदवारीची चर्चा आता चांगलीच जोर धरु लागली आहे. त्याला कारणंही तशीच आहेत. जाणून घेऊयात जगदीश मुळीक यांचं पारडं का जड मानलं जातंय.

मुद्दा क्रमांक एक- जगदीश मुळीक हे देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. भाजपसाठी अवघड असलेल्या वडगाव शेरी सारख्या मतदारसंघात त्यांनी आमदारकी मिळवली होती. मुद्दा क्रमांक दोन- महापालिका निवडणुकीतही जगदीश मुळीक यांनी वडगाव शेरीमधून सर्वात जास्त नगरसेवक निवडून आणले होते. त्यामुळे आता मुळीक यांना संधी मिळेल, असं गणित राजकीय विश्लेषक मांडत आहेत.

मुद्दा क्रमांक तीन- युवा चेहरा, स्वच्छ प्रतिमा अशी जगदीश मुळीक यांची ओळख आहे. शहराध्यक्ष पदाचा पदभार असताना त्यांनी पुणे शहरात जोडलेले कार्यकर्ते तसंच कोविड काळात केलेले कार्य, अशा अनेक गोष्टी मुळीक यांच्या जमेच्या बाजू आहेत. मुद्दा क्रमांक चार- वडगाव शेरी, पुणे कँटोन्मेंट (Pune News) , शिवाजीनगर या तीन विधानसभा मतदारसंघात जगदीश मुळीक यांचा दांडगा जनसंपर्क आहे, यामुळे त्यांच्या उमेदवारीला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळणार, हे निश्चित मानलं जात आहे.

काँग्रेस विरुद्ध भाजप सामना-

आणि आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा- भाजपकडून मागच्या काही वर्षात कोथरुडला सर्वाधिक संधी दिली गेली आहे. स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, पालकमंत्री, राज्यसभा खासदार, प्रदेश अध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रीय उपाध्यक्ष अशी सर्वच महत्त्वाची पदं कोथरुडच्या पदरात पडली आहेत. कसबा पोटनिवडणुकीत धंगेकरांच्या रुपात भाजपचा अनेक दशकाचा बालेकिल्ला धासळला आणि परत तेच धंगेकर काँग्रेसकडून लोकसभेचे उमेदवार निश्चित होत आहेत. काँग्रेसचा परंपरागत मतदार असलेल्या पूर्व पुण्यातून, आपला उमेदवार देऊन भाजपला धंगेकर फॅक्टर निष्प्रभ करावा लागणार आहे. त्यातही पुणे लोकसभेत सर्वाधिक ४.५ लाख मतदार हे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात आहेत. त्यामुळे वडगाव शेरीचे आमदार व नंतर भाजपचे शहराध्यक्ष राहिलेल्या तरुण व स्वच्छ प्रतिमेच्या जगदीश मुळीक यांचे तिकीट म्हणूनच नक्की झाल्यात जमा आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, पुण्यात आता भाजपचे जगदीश मुळीक विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर अशीच लढत होईल, हे जवळपास निश्चित झालं आहे.

News Title : pune news jagdish mulik to be final for loksabha election

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियाच्या खेळाडूची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली दखल, मोठं कारण आलं समोर

“भाषण करायची वेळ आली की अजित पवार बाथरुमकडे पळायचे”; जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक, चिपळूणमध्ये नेमका काय राडा घडला वाचा सविस्तर…

मोठी बातमी- धनगर आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाने दिला सर्वात मोठा निर्णय

जॉनी सीन्सला स्वत: रणवीरने केली होती ‘ही’ विनंती