पुण्यात दोघांना चिरडणाऱ्या बिल्डरच्या मुलाला जामीन; मृतांच्या नातेवाइकांकडून संताप

Pune News | पुण्यामध्ये कल्याणीनगर परिसरात एका लक्झरी पोर्श कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रविवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास बॉलर पबजवळ ही घटना घडली होती.

या अपघातानंतर अल्पवयीन मुलावर कारवाई करण्यात आली. कारचालक अल्पवयीन मुलगा एका नामांकित रिअल इस्टेट डेव्हलपरचा मुलगा आहे. या 17 वर्षाच्या मुलाला ताब्यात घेण्यात आलं होतं. आता मिळालेल्या माहितीनुसार आरोपी तरुणाला 12 तासांच्या आत जामीन मंजूर झालाय.

अल्पवयीन आरोपीला 12 तासांच्या आत जामीन

काही मीडिया रिपोर्टनुसार, अल्पवयीन आरोपीच्या वडिलांविरोधात आणि बार मालकाविरोधात कलम 75 आणि 77 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. आरोपी अल्पवयीन असल्यामुळे वडिलांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी हा 17 वर्षांचा असून त्याच्याकडे कार चालवण्याचा परवानाही नाही. अशात त्याने दारू पिऊन गाडी चालवली. बार मालकाने दारु सर्व्ह केल्यामुळे त्याच्या विरोधातही कारवाई केली जाणार आहे. आरोपी मुलगा अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पण, लोकांनी त्याला पकडून चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

मुलाच्या वडिलांवर आणि दारू देणाऱ्या पबवर कारवाई होणार

या आरोपी मुलाला जामीन मिळाल्यानंतर मृतांच्या नातेवाइकांकडून (Pune News) संताप व्यक्त करण्यात आला. काही अटी-शर्तींसह हा जामीन कोर्टाने मंजूर केलाय. आरोपी साडेसतरा वर्षांचा असून त्याला प्रौढ समजून खटला चालवला जावा अशी मागणी पोलिसांनी केली. पण, आरोपीला काही अटींवर जामीन मंजूर केला आहे.

पुण्यातल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. न्यायालयाने आता आरोपीला 15 दिवस येरवडा विभागात ट्राफिक कॉन्स्टेबलसोबत वाहतुकीचं नियोजन करण्याचे (Pune News) देखील आदेश दिले असल्याची माहिती आहे.  शिवाय त्याचे मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन करण्याचे देखील सांगितल्याचं म्हटलं जातंय.

News Title –  Pune News Kalyani Nagar Porsche Car Accident Bail to the accused

महत्त्वाच्या बातम्या-

“सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्याबाबत डील झाली होती”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा गोप्यस्फोट

अभिनेत्री यामी गौतमला पुत्ररत्न; बाळाच्या युनिक नावाची एकच चर्चा, जाणून घ्या अर्थ

अक्षय कुमारने बजावला पहिल्यांदा मतदानाचा हक्क; म्हणाला आपला भारत नेहमीच….

“भाजप गरज संपल्यावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेबाबत..”; शरद पवारांनी दिली धोक्याची घंटा

बारावीच्या निकालाची तारीख ठरली! ‘या’ दिवशी लागणार निकाल