मुसळधार पावसामुळे पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर, प्रशासन अलर्ट मोडवर

Pune News | आज राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकणभाग, पश्चिम महाराष्ट्र, ठाणे, रायगड आणि मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने जोर धरला आहे. यामुळे राज्यातील काही भागांमध्ये पूरजन्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. मुंबई शहराला पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तर पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातही पावसाने हाहाकार माजवला आहे. तसचे काही नद्यांनी पाणी पातळी ओलांडली आहे. यामुळे हे पाणी आता रस्त्यावर येऊ शकतं. (Pune News)

मुसळधार पावसाने शाळांना सुट्टी

पिंपरी चिंचवड येथील पवना नदीची पाणी पातळी वाढली आहे. यामुळे हे पाणी आसपासच्या भागातही जाऊ शकते. यामुळे पूरजन्य परिस्थिती दिसून येते. तसचे पुणे जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्र असलेला क्षेत्र म्हणजे लोणावळा. या भागातही ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे लोणावळ्यातील शाळांना सुट्टी दिली गेलीय. (Pune News)

लोणावळ्यात सखल भागात पावसाचे पाणी साचलं आहे. पुणे येथील सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या नागिरकांच्या घरात पाणी शिरलं आहे.  त्यामुळे पूरात अडकलेल्या पाण्यात NDRF च्या जवानांनी सुखरूप बाहेर काढलं. तर दुसरीकडे सुरू असलेल्या पावसाने पुण्यात एक दुर्घटना देखील घडली. शॉक लागून तिघांचा मृत्यू झाला.

पुणे खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा सकाळी 6:00वा. 35574 क्यूसेक्स करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे धरण परिसरात 100 मिमी आणि घाटमाथ्यावर 200 मिमी पेक्षा जास्त सरासरीचा पाऊस झाला आहे. याचपार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी ट्विट करत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचं ट्विट

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळीच जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख श्री. सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच बचाव व मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला. खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने जिल्हा प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. गरज पडताच नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले. पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनीही पावसाचा जोर कमी होईपर्यंत आवश्यक ती काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे माझे आवाहन आहे, असं अजित पवार यांनी ट्विट केलं.

पुणे आणि परिसरात पाऊस सुरू आहे. यामुळे शहराचा बहुतांश भागात रस्त्यांवर पाणी साठले आहे . याखेरीज काही सोसायट्या आणि घरांमध्ये पाणी शिरले आहे. पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. याबाबत मी स्वतः जिल्हाधिकारी,पुणे आणि जिल्हा प्रशासन यांच्या संपर्कात असून परिस्थितीचा आढावा घेत आहे. ज्या नागरीकांना मदतीची गरज आहे तिथं प्रशासकीय यंत्रणेसह आम्ही सर्वजण उपलब्ध आहोत. नागरीकांना देखील विनंती आहे की,अत्यंत महत्वाचे व गरजेचे असेल तरच घराबाहेर पडावे, काळजी घ्या, असं ट्विट सुप्रिया सुळेंनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

राज्यभरात पावसाचा हाहाकार! नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, रस्ते वाहतूकही ठप्प

ऐश्वर्या-अभिषेक घेणार ग्रे घटस्फोट?, ‘त्या’ पोस्टमुळे चर्चेला उधाण

पावसाळ्यात ‘हे’ अन्नपदार्थ खाऊ नका; अन्यथा होतील पोटाचे गंभीर विकार

तळीरामांची चांदी! देशभरात दारू होणार स्वस्त?, अर्थसंकल्पात काय केली तरतूद?

बजेटनंतर ‘या’ 9 शेअरमध्ये करा गुंतवणूक; होईल फायदाच फायदा