चंद्रकांत पाटलांच्या विजयाबाबत मेधाताई कुलकर्णी यांना विश्वास; म्हणाल्या, “सर्वाधिक मताधिक्य..”

Pune News | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सर्वच नेते, मंडळी यांच्या प्रचारसभा सध्या राज्यभर गाजत आहेत. पुण्यातील बाणेर बालेवाडी येथे कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला प्रा. डॉ. मेधाताई कुलकर्णी , माधवजी भंडारी यांचीपरमुख उपस्थिती होती.  याच कार्यक्रमात मेधाताई कुलकर्णी (Medhatai Kulkarni) यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला. (Pune News)

लोकसभा निवडणुकीला मुरलीधर मोहोळ यांना बाणेर बालेवाडीतून 22 हजारांचे मताधिक्य मिळाले. हाच पॅटर्न कायम ठेवत विधानसभा निवडणुकीत प्रभाग 9 मधून सर्वाधिक मताधिक्य मिळाले पाहिजे, असा विश्वास प्रा. डॉ. मेधाताई कुलकर्णी यांनी व्यक्त केला. तसेच, भविष्याच्या दृष्टीने ही विधानसभा निवडणूक आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

बाणेरने भाजपला भरभरून प्रेम दिलंय- मेधाताई कुलकर्णी

बाणेर बालेवाडी या भागाने भाजपा-महायुतीवर भरभरुन प्रेम केले आहे.2014 च्या विधानसभा निवडणुकीत मनात प्रचंड धाकधुक होती. कारण, त्यापूर्वी महापालिकेच्या माध्यमातून एका ठराविक भागातून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. पण 2014 पासून या भागातून जे प्रेम आणि विश्वास मिळाला, तो अवर्णनीय आहे.‌ नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही या प्रभागातून मुरलीधर मोहोळ यांना 22  हजारांचे मताधिक्य मिळाले. विधानसभा निवडणुकीत हाच पॅटर्न कायम ठेवला पाहिजे,असंही मेधाताई पुढे म्हणाल्या. (Pune News)

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षांत ज्या पद्धतीने विकासकामे संपूर्ण देशात राबविली आहेत, त्यामुळे आज संपूर्ण जगात देशाची प्रतिमा उंचावली आहे. याचा अनुभव आपल्याला परदेशात गेल्यावर सहज जाणवतो. त्यामुळे मोदीजींच्या विकास यात्रेत महाराष्ट्र ही असला पाहिजे. त्यासाठी विधानसभेत महायुतीचा प्रत्येक उमेदवार महत्वाचा आहे. लोकसभा निवडणुकीला अनेक ठिकाणी आपण गाफील होतो. त्यामुळे त्याचा फटका आपल्याला बसला आहे. वक्फ सारख्या कायद्यात बदल करणं ही आवश्यक आहे. त्यामुळे कोथरूड मधून चंद्रकांतदादा पाटील यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करावे”, असे आवाहनही प्रा. डॉ. मेधाताई कुलकर्णी यांनी केले आहे.  (Pune News)

लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरणार- चंद्रकांत पाटील

तर, चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात केवळ विधानसभेची निवडणूक नसून, लोकसभेत जी आपली पिछेहाट झाली, त्यामुळे विरोधक एकप्रकारचा खोटा नॅरेटिव्ह सेट करु पाहत आहेत. तो खोडून काढण्यात हरियाणा, जम्मू काश्मीर यश मिळाले. महाराष्ट्रात हा खोटा नॉरेटिव्ह खोडून काढण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून सात हप्ते दिले. खरंतर ही योजना गेमचेंजर ठरणार आहे. या योजनेमुळे दोन कोटी 20 लाख महिला आनंदात आहेत.

ते पुढे म्हणाले की, 1982 पासून मी पुणे जवळून पाहत आहे. 1982 च्या तुलनेत आज पुण्याची लोकसंख्या 72 लाखांवर पोहोचली आहे. सध्या पुण्याच्या रस्त्यांवरुन 53 लाख वाहने धावत आहेत.‌ यंदा दिवाळी पाडव्याला 21 हजार वाहने खरेदी झाली. त्यामुळे हा आकडा पाहता पायाभूत सुविधा वाढविण्यावर आमचा सातत्याने भर आहे. मेट्रो सारख्या प्रकल्पामुळे आज हजारो पुणेकर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे वळले आहेत. चांदणी चौक सारख्या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या सुटण्यास मदत झाली आहे. 24 × 7 अंतर्गत समान पाणीपुरवठ्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून बाणेर मधील पहिली टाकी कार्यान्वित झाली आहे. विकासकामांची ही गती कायम राखण्यासाठी 22 तारखेला जास्तीत जास्त मतदान व्हावे, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले. (Pune News)

‘या’ प्रमुख नेत्यांची उपस्थिती

दरम्यान, या कार्यक्रमाला व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबुराव चांदोरे,रिपाइंचे ॲड मंदार जोशी, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, भाजपा कोथरूड उत्तर मंडलचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, शहर सरचिटणीस पुनीत जोशी, प्रकाशतात्या बालवडकर, लहू बालवडकर, सनी निम्हण, राहुल कोकाटे, सागर बालवडकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूनम विधाते, संतोष पाषाणकर उपस्थित होते. (Pune News)

यावेळी भाजप नेते माधवराव भंडारी, अमोल बालवडकर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबुराव चांदोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल उत्तम कळमकर यांचे भाजपा कोथरूड मंडलाच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी सचिन दळवी, उमाताई गाडगीळ, मोरेश्वर बालवडकर, विवेक मेथा, रोहन कोकाटे, अस्मिता करंदीकर, सुभाष भोळ, प्रमोद कांबळे, शिवम सुतार, रिपाइंचे संतोष गायकवाड, भाजपा नेत्या वंदना सिंह, कल्याणी टोकेकर, जागृती विचारे, सुरेखा वाबळे, प्रमोद कांबळे, उत्तम जाधव, अनिकेत चांदेरे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते. (Pune News)

News Title :  Pune News Medhatai Kulkarni believes in Chandrakant Patil victory

महत्वाच्या बातम्या –

महादेवाच्या कृपेने आज ‘या’ राशींची इच्छापूर्ती होणार!

“त्याने मला शारीरिक दुखापत केली…”, अखेर ऐश्वर्या राय स्पष्टच बोलली

संविधानाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या- रामदास आठवले

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुनील माने यांना मोठी जबाबदारी!

‘अजित पवारांची दादागिरी’; ‘त्या’ व्हिडीओने राजकीय वर्तुळात खळबळ