Pune News | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिंदी-मराठी भाषा वाद पेटताना दिसून येत आहे. ठाण्यात मुंब्रा येथील एक मराठी तरुण आणि फळ विक्रेत्याच्या वादाची घटना ताजी असतानाच आता पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या वादात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उडी घेतली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या एअरटेलच्या टीम लीडरला चांगलाच चोप दिला आहे. (Pune News)
पुण्यात नेमकं काय घडलं?
पुणे वाकडेवाडी येथे एअरटेलचं शोरुम असून या ठिकाणी ही घटना घडली. येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी शाहबाज अहमद नावाच्या टिम लीडरची चांगलीच धुलाई केली. एअरटेलच्या कर्मचारी वर्गाला फ्लोअर वर हिंदीच बोलायचं, मराठीत बोलले तर कामावरून काढून टाकेन, अशी धमकी देणाऱ्या शाहबाज अहमदचा मनसेने समाचार घेतला. (Pune News)
येथील कर्मचाऱ्यांनी मनसेकडे याबाबत तक्रार केली होती. हिंदू सणांना सुट्टी न देणं तसच मागच्या तीन महिन्यांपासून आमचा पगार देखील दिला नाही, अशी तक्रार येथील कर्मचाऱ्यांनी मनसेकडे केली होती. इतकंच नाही तर, ‘कोणत्याही सेनेला घेऊन या, कामावरून काढून टाकतो. बघतोच आता कोण येतंय’ असंही शाहबाज अहमदने एअरटेल शो रुममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना म्हटलं होतं.
पुढे येथील कर्मचाऱ्यांची मनसेकडे याबाबत तक्रार केली. यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली. येत्या सोमवारपर्यंत पगार करा, अन्यथा एकाच वेळी एकाच दिवशी स्वारगेट, वाकडेवाडी, खराडी येथील तीन एअरटेल ऑफिस फोडून टाकणार, असा इशाराच मनसे राज्य सचिव आशिष साबळे पाटील यांनी दिलाय.
मुंब्र्यात काय घडलं?
तर, काही दिवसांपूर्वी मुंब्र्यात देखील एक धक्कादायक प्रकार घडला होता. मुंब्र्यात राहणारा विशाल गवळी हा मुलगा बहिणीसाठी औषध घ्यायला बाहेर गेला होता. तेथून तो फळ घ्यायला गेला. फळ विक्रेत्याने 100 रुपये किलो भाव सांगितला. त्यावर त्याने 50 रुपयाला देणार का? म्हणून विचारणा केली. हा फळ विक्रेता हिंदीत बोलत होता. त्यावर हा मुलगा त्याला मराठीत बोल असं म्हणाला आणि यावरून वाद सुरू झाला. (Pune News)
News Title : Pune News MNS workers beat airtel team leader
महत्वाच्या बातम्या –
शरद पवार महायुतीत सामील होणार?, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
आज शनिदेव ‘या’ राशींवर राहणार प्रसन्न, नववर्षातील पहिली शुभवार्ता मिळणार
“पुरुषांनी सुरक्षित किंवा असुरक्षित सेक्स…”, प्रसिद्ध गायिकेचं विधान चर्चेत!
‘ते टॉप सिक्रेट…’; सुरेश धस यांच्या नव्या गौप्यस्फोटाने एकच खळबळ
पदभार स्विकारताचं एकनाथ शिंदे अॅक्शनमोडमध्ये; घेतला मोठा निर्णय