पुणेकरांना महिंद्रांकडून नववर्षात सर्वात मोठं गिफ्ट, तब्बल 4500 कोटी…

Pune News New Mahindra And Mahindra Factory

Pune News | उद्योजक आनंद महिंद्रांच्या नेतृत्वाखालील महिंद्रा कंपनीने पुणेकरांना नवीन वर्षात मोठं गिफ्ट दिलं आहे. पुण्यातील चाकणमध्ये नवीन कारखाना उभारण्यात आला आहे. यात इलेक्ट्रीक वाहनांमधील बॅटरी तयार केल्या जाणार आहेत. कारखान्यात इलेक्ट्रीक बॅटरी असेम्बली सेटअप तयार करण्यात आले असून जगातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वोच्च दर्जाचे प्रोडक्ट या कारखान्यातून बाहेर पडणार आहेत. ( Pune News)

मिळालेल्या माहितीनुसार, महिंद्राच्या या नव्या कारखान्यामध्ये इलेक्ट्रीक एसयुव्हीमधील ओरिजन सुटे भागही तयार केले जाणार आहेत.हा प्रकल्प भारतामधील सर्वात मोठा ग्रीनफिल्ड प्रोजेक्ट असून तब्बल 2.83 स्वेअर किलोमीटर इतकं त्याचं एकूण क्षेत्रफळ आहे. चाकणमध्ये अगोदरच एसयुव्ही तयार करण्याचा महिंद्राचा कारखाना आहे.

4500 कोटी रुपयांची गुंतवणूक

अशात महिंद्रा ग्रुप येथे तब्बल 16 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. याच 16 हजार कोटींपैकी 4500 कोटी रुपयांची गुंतवणूक पुण्यातील चाकणमध्ये असलेल्या या नव्या प्रकल्पात केली जाणार असल्याची माहिती आहे. इलेक्ट्रीक वाहनांच्या निर्मितीचे कारखाने हे ऑटोमॅटिक सेटअपमध्ये काम करतात. त्यामुळे येथे एक हजारांहून अधिक रोबोट्स काम करतील, अशी माहिती आहे. ( Pune News)

या कारखान्यामध्ये पूर्णपणे ऑटोमॅटिक प्रेस शॉपबरोबरच एआयवर काम करणारे बॉडी शॉप आणि पेटींगसाठी रोबोट्सची मदत घेतली जाणार आहे. हे रोबोट बॉडी शॉप मॉनेटरिंग करतील. या कारखान्यामध्ये 4.0 जनरेशनचं तंत्रज्ञान असणार आहे. यात ऑटोनॉमस मोबाईल रोबोट्स आणि ओटोमेटेड गाईडेड व्हेईकर्सचा समावेश असेल.

टेस्टींगचीही सुविधा

तसेच कारखान्यामध्ये निर्मिती केलेल्या प्रोडक्टच्या चाचणीची सोयही असणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष प्रोडक्ट वापरताना येणाऱ्या अडचणींची प्रात्यक्षिकं स्टिम्युलेशनच्या माध्यमातून प्रोडक्ट्सवर आजमावून पाहिली जाणार आहेत. पुण्यामध्ये आधीपासूनच महिंद्रा कंपनीच्या एसयुव्ही प्रोडक्शनचं युनिट कार्यरत असताना आता त्यात ही नवी भर पडणार आहे. ( Pune News)

News Title : Pune News New Mahindra And Mahindra Factory

महत्वाच्या बातम्या-

‘महिलांना घरात अधिकार देऊ नका, अन्यथा…’; युवराज सिंहच्या वडिलांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

 महापालिका निवडणुकीचा मुहुर्त ठरला! CM फडणवीसांनी दिले संकेत

बीडमध्ये हालचालींना वेग, नवीन SIT स्थापन होताच महत्त्वाचा निर्णय

‘माझ्या लेकानं काही केलं नाही, तो निर्दोष…’; वाल्मिक कराडच्या आईचं परळीत आंदोलन

वाल्मिक कराडविरोधात सीआयडीचं सर्वात मोठं पाऊल!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .