पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

Pune News | पुण्यातील ट्रॅफिक दिवसेंदिवस वाढत असतानाचं चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. पुणे शहरातील पोलिसांनी अनेक वेळा नियमावाली जारी करुन देखील पुणेकरांकडून नियमांचं उल्लंघन करण्यात आलंय. त्यामुळे आता पुणे पोलिसांनी मोठं पाऊल उचललं आहे.

काय आहे प्रकरण?

वारंवार सांगून देखील पुणेकरांकडून (Pune News) वाहतूक नियमांचं पालन होत नसल्याचं समोर येत आहे. दरम्यान आता पुणे पोलिसांनी नवीन सिस्टिम आणली आहे. जर वाहनचालकाने वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं तर त्याच्यावर आता थेट इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम या प्रणालीद्वारे कारवाई करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.

फोटोसह पावती मोबाईलवर-

ही सिस्टिम एआय तंत्रज्ञान आधारित यंत्रणा असणार आहे. यामुळे वाहतूक नियमाचे उल्लंघन केलं तर अवघ्या पाच मिनिटात दंडाची पावती मोबाइलवर फोटोसह जाणार आहे. त्यासाठी पोलीस ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्नेशन कॅमेऱ्याची मदत घेणार आहेत. एवढंच नाही तर आता पुणे (Pune News) शहराच्या चौका चौकात कॅमेरे लावण्यात आले आहेत. 

कॅमेऱ्याद्वारे पुणे पोलिसांची यंत्रणा राबणार आहे. एआय तंत्रज्ञानामुळे कोणी वाहतुकीचा नियम मोडला तर लगेच पुणे पोलिसांना कळणार आहे. त्यानंतर त्या व्यक्तीच्या मोबाईलवर पाच मिनिटात पावती येणार आहे.

News Title : Pune News new traffic rules

महत्त्वाच्या बातम्या-

सावधान! ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा; ऑरेंज अलर्ट जारी 

‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’चा नवा विक्रम, रुग्णांना 300 कोटीहून अधिक अर्थसहाय्य

दररोज फक्त 45 रुपयांची गुंतवणूक करा, 25 लाखांचा निधी मिळवा; जाणून घ्या योजना

‘…तर तुमच्या अंडरपॅन्ट शिल्लक राहणार नाहीत’; मिटकरींचा मनसे नेत्यांना इशारा

लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा त्रस्त?, धक्कादायक सत्य आलं समोर