शिवजयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीमध्ये मोठा बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Pune News PMP Route Changes for Shiv Jayanti

Pune News | छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंती 19 फेब्रुवारीला शहर व परिसरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज रस्ता आणि लक्ष्मी रस्ता येथून मिरवणूक निघत असल्यामुळे पोलिसांनी वाहतुकीमध्ये बदल केला आहे. (Pune News)

मिरवणुकीमुळे वाहतुकीत बदल

भवानी पेठेतील भवानीमाता मंदिर (Bhavanimata Mandir) येथून शिवप्रतिमेची मिरवणूक दुपारी चार वाजता निघणार आहे. छत्रपती शिवाजी पुतळा (सिव्हिल कोर्ट) (Civil Court) येथे मिरवणुकीची सांगता होणार असल्यामुळे शिवाजी रस्ता व लक्ष्मी रस्त्यावरून जाणाऱ्या बसचा मार्ग बदलण्यात येणार आहे.

पर्यायी बसमार्ग

या मार्गावरील बसेस जंगली महाराज रस्ता (Jangali Maharaj Road), डेक्कन (Deccan), टिळक चौकाच्या पुढे कुमठेकर रस्ता, विश्रामबाग वाडा (Vishrambaug Wada), मंडईमार्गे स्वारगेट (Swargate) चौकात येऊन पुढे नेहमीच्या मार्गाने जातील.

लक्ष्मी रस्ता वाहतुकीस बंद झाल्यावर या मार्गावरील बस पुणे स्टेशनमार्गे (Pune Station), पोलिस आयुक्त कार्यालय (Police Commissioner Office), वेस्टएंड टॉकीज (Westend Talkies), महात्मा गांधी बसस्थानक (Mahatma Gandhi Bus Station), गोळीबार मैदान (Golibar Maidan), स्वारगेट (Swargate) व पुढे नेहमीच्या मार्गाने संचलनात राहतील. फडके हौद/दारूवाला पूल वाहतुकीस बंद झाल्यानंतर या मार्गावरील बस पुणे स्टेशनकडे (Pune Station) जाताना कुंभारवाडा (Kumbharwada), जुना बाजार (Juna Bazar), मंगळवार पेठ (Mangalwar Peth) या मार्गाने संचलनात राहतील. (Pune News)

Title : Pune News PMP Route Changes for Shiv Jayanti

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .