Pune News | पुणे विमानतळाच्या (Pune Airport) नवीन टर्मिनलमध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बससाठी जागा देण्याच्या केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्र्यांच्या आदेशाला विमानतळ प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. ‘एरोमॉल’ (‘Aeromall’) प्रशासनाच्या विरोधामुळे पीएमपी बसला नवीन टर्मिनलमध्ये प्रवेश मिळत नसल्याचे समजते. (Pune News)
प्रवाशांची गैरसोय आणि आर्थिक फटका
विमानतळ प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना त्रास होत असून, त्यांना आर्थिक फटका बसत आहे. रामवाडी ते पुणे विमानतळ या मार्गावर पीएमपी बससेवा सुरू आहे, पण नवीन टर्मिनलमध्ये प्रवेश नसल्याने बस ‘एरोमॉल’ शेजारी बाहेर उभी करावी लागते.
प्रवाशांना पीएमपी बस दिसत नसल्याने ते नाइलाजाने खासगी कॅबचा पर्याय निवडतात, ज्यामुळे त्यांना जास्त पैसे मोजावे लागतात. पीएमपी आणि मेट्रो (Metro) कमी दरात उपलब्ध असतानाही, केवळ बसला आत प्रवेश नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
विमानतळ प्रशासन आणि ‘एरोमॉल’चा दावा
पीएमपी प्रशासनाने विमानतळ प्रशासनाकडे नवीन टर्मिनलमध्ये जागा देण्याची मागणी लेखी पत्राद्वारे केली होती. प्रवाशांनी हा प्रश्न केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यासमोर उपस्थित केल्यानंतर त्यांनी विमानतळ प्रशासनाला पीएमपी बसला आतमध्ये सोडण्याची परवानगी देण्याची सूचना केली. मात्र, महिना उलटून गेला तरी, अद्याप जागा मिळालेली नाही.
‘एरोमॉल’ प्रशासनाने दावा केला आहे की, “टर्मिनलचा पूर्ण विकास झालेला नाही. आतमधील रस्त्यांची कामे सुरू आहेत. टर्मिनलमध्ये बस उभी करण्यास जागा नाही. त्यामुळे पीएमपीला आतमध्ये जागा दिली जात नाही. बस आतमध्ये सोडल्यास वाहतूक कोंडी होऊ शकते.” एरोमॉलचे उपाध्यक्ष वाय. एस. राजपूत (Y. S. Rajput) यांनी सांगितले की, “वाहतूक नियोजनासंदर्भात एरोमॉल आणि विमानतळ प्रशासन यांच्यात करार झाला आहे. त्यानुसार सर्वांसोबत बैठक घेऊन पीएमपीला ‘एरोमॉल’च्या बाजूला जागा देण्यात आली आहे. नवीन टर्मिनलमध्ये बस उभी करण्यासाठी जागा नाही.” (Pune News)
News Title : Pune News PMPML Denied Space at Pune Airport’s New Terminal