पुणे पोर्शे कार प्रकरणी धक्कादायक माहिती समोर!

Pune News | पुणे पोर्शे कार प्रकरणी नवनवीन खुलासे बाहेर येत आहे. हिट अँड रन प्रकरणी अलपवयीन तरुण तसेच त्याच्या कुटुंबाला अटक करण्यात आली आहे. पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये तीन ते चार गुन्हे घडले असल्याची बाब आता समोर आली आहे. अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. दरम्यान, आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ज्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडालीये.

तीन लाखांची लाच-

रक्ताचे सॅम्पल बदलण्यासाठी (Pune News)  डॉ. श्रीहरी हळनोरला अशपाक मकानदार आणि अमर गायकवाड या दोघांनी तीन लाख रुपये बाल हक्क न्याय मंडळाच्या आवारात दिले होते. पोलिस तपासात हे उघड झाल्यानंतर अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाडला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांच्या चौकशीतून लाचेच्या पैशातही अफरातफर झाल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, अशपाक मकानदारला ज्या व्यक्तीने पैसे घेतले होते त्याने तीन लाख नाही तर चार लाख रुपये दिले. अशपाकने त्यापैकी तीन लाख रुपये डॉक्टर श्रीहरी हळनोरला अतुल घटकांबळेच्या मार्फत दिले. चार लाख रुपयांमधील एक लाख रुपये स्वतःकडे ठेवले असल्याचं आता तपासातून समोर आलं आहे.

दोघांना अटक-

गेल्या काही दिवसांपूर्वी पूण्यात (Pune News) हिट अँड रन प्रकरणी सगळीकडे खळबळ उडाली होती. पोर्शे कार अपाघातामध्ये 2 तरुणांचा मृत्यू झाला. या वेळी अलपवयीन आरोपीचे रक्त तपासले होते. यावेळी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोरला यांनी आरोपीचे रक्ताचे नमुने बदल्याचं समोर आलं. तीन लाखांची लाच घेऊन सॅम्पल कचऱ्यात फेकल्याने ससून रुग्णालयातील दोघांना अटक करण्यात आली होती.

News Title : pune news porshe car accident update

महत्त्वाच्या बातम्या-

चंद्राबाबू नायडू चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, मोदींच्या उपस्थितीत घेतली शपथ

थकवा, हातापायाला मुंग्या येतात?, असू शकते व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता; करा ‘हा’ उपाय

“मोदी अहंकारी आहेत, ते मुस्लिमांचा द्वेष करत नाही हे त्यांनी पटवून द्यावं”

बुलढाण्यात मोठी दुर्घटना; वादळी वाऱ्यामुळे झोक्यात झोपलेली चिमुकलीही पंत्र्यांसोबत उडाली

“भारतीयांनी आळशी होऊ नये, देश अजूनही..”; कंगना रनौतचं मोठं आवाहन