Pune News | उन्हाळ्यामध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने, पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणखी दोन बॅगेज स्कॅनर मशिन्स बसवण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यामुळे रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक सुरक्षित वाटेल, तसेच अनुचित प्रकारांना आळा बसेल. (Pune News )
प्रवाशांच्या बॅगांची होणार तपासणी
पुणे रेल्वे स्थानकावरून (Pune Railway Station) दररोज २०० हून अधिक रेल्वे गाड्यांची ये-जा असते. प्रवाशांची संख्या देखील मोठी आहे. पूर्वी, प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर एक स्कॅनिंग मशीन होते. मात्र, ताडीवाला रोडकडून येणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा तपासल्या जात नव्हत्या. आता फूट ओव्हर ब्रिजवर (Foot Over Bridge) दोन नवीन स्कॅनर मशीन बसविल्यामुळे, सर्व प्रवाशांच्या बॅगांची तपासणी करणे शक्य होणार आहे.
रेल्वे स्थानकात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या बॅगेची तपासणी या मशीनद्वारे केली जाईल. यामुळे, रेल्वेतून कोणतीही संशयास्पद वस्तू नेण्यास प्रतिबंध होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.
सुरक्षा व्यवस्थेत वाढ
रेल्वे स्थानकावर बसवण्यात आलेल्या या दोन बॅग स्कॅनर मशीनमुळे येथील स्कॅनर मशीनच्या संख्येत वाढ झाली आहे. एक मशीन मुख्य प्रवेशद्वारावर, दुसरी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील सरकत्या जिन्याजवळ आणि तिसरी मशीन प्लॅटफॉर्म क्रमांक 6 जवळील जिना चढल्यावर ठेवण्यात आली आहे. (Pune News )
“रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. कोणत्याही अवैध वस्तूची ने-आण होऊ नये, यासाठी हे स्कॅनर बसवले आहेत,” असे जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहरा (Hemantkumar Behra) यांनी सांगितले. आरपीएफ (RPF) कर्मचाऱ्यांकडून स्कॅनर मशीनची तपासणी केली जात आहे.
Title : Pune News Railway Station Enhances Security with New Scanners