Pune News | रिल्सने अनेकांच्या आयुष्याला कलाटणी दिली आहे मात्र हा रिल्सचा नाद अनेकांच्या जीवावर देखील बेतला आहे. तरूणाईला आपल्या जीवापेक्षा रिल्स अगदी प्यारं आहे. काही लाईक्ससाठी लोक जीवघेणे स्टंट देखील करतात. याचं उत्तम उदाहरण पुणे शहरात पाहायला मिळालंय.
रिल्स करताना तरूणीचा जीवघेणा स्टंट
पुणे शहर (Pune News) हे विद्येचं माहेरघर आहे. मात्र या पुणे शहरात (Pune News) तरूणाई रिल्समुळे भरकटली असल्याचं दिसून आलं आहे. रिल्स करत तरूणाई जीवघेणे स्टंट करत आहेत.
पुणे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ असलेल्या एका उंच वास्तूवर ही तरूणी स्टंट करताना दिसत आहे. ही तरूणी या उंच वास्तूवरून खाली वाकताना दिसली आहे. तर वरती असलेल्या एका तरूणाने तिचा हात पकडला. चुकूनही जर तिचा हात सुटला असता तर होत्याचं नव्हतं होऊन बसलं असतं.
या घटनेचा व्हिडीओ अंगावर शहारा आणणारा आहे. या स्टंटचं चित्रीकरण करण्यासाठी त्याठिकाणी कॅमेरामन देखील आहे. तो या स्टंटचं चित्रीकरण करत आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे हे माहिती नाही. मात्र आता तो व्हिडीओ व्हायरल झालेला दिसून आलं आहे. याप्रकरणी पोलीस कारवाई करणार का हे पाहणं गरजेचं आहे.
रिल्स बनवत गाडी चालवणं पडलं महागात
छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रिल्स बनवत असताना गाडी चालवणं एका तरूणीच्या जीवावर बेतलं आहे. संभाजीनगरच्या दौलताबाद येथील सूलीभंजन येथील दत्त मंदिराजवळ हा भयानक अपघात झाल्याचं दिसून आलं. तरूणीचं वय हे अवघं 23 वर्षे होतं.
News Title – Pune News Reels Viral Video About Girl Shocking Video
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापुरात अजित पवार गटाला मोठा झटका?, माजी आमदार मविआच्या वाटेवर?
हायकोर्टाने दिला मोठा झटका; 65 टक्के वाढीव आरक्षणाचा निर्णय रद्द
मराठा आरक्षणावर शरद पवारांचं मोठं विधान!
लोकसभेतील अपयश सामूहिक, ‘अकेला देवेंद्र’ जबाबदार नाही’
महागाईचा झटका! पेट्रोल-डिझेलचे दर तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार