जुन्नरमधील शिवनेरी ट्रेकर्सची कामगिरी; स्वातंत्र्यदिनी ‘कांगयात्से’वर फडकवला तिरंगा

Pune News | काल 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी जुन्नर येथील शिवनेरी ट्रेकर्स असोसिएशनच्या पाच गिर्यारोहकांनी उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली. या पथकाने स्वातंत्र्यदिनी लद्दाख मधील 6250 मी. उंच शिखर कांगयात्सेची यशस्वी चढाई करून तिरंगा फडकवला व राष्ट्रगीत गायले. (Pune News)

शिवनेरी ट्रेकर्स असोसिएशनचे अध्यक्ष निलेश खोकराळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या मोहिमेत विकास सहाणे, किशोर साळवी, अरूण रासकर व संतोष डुकरे या प्रशिक्षित गिर्यारोहकांचा समावेश होता. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लद्दाख मधील 6250 मी.उंच शिखरावर फडकला तिरंगा

शिवनेरी ट्रेकर्स मार्फत 2027 मध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या माऊंट एव्हरेस्ट शेतकरी मोहिमेच्या तयारीचा भाग म्हणून भारतीय हिमालयासोबतच नेपाळ व इतर ठिकाणी गिर्यारोहण मोहिमांचे आयोजन सुरु आहे. कांगयात्से 2 ही या मालिकेतील पहिली यशस्वी मोहिम ठरली आहे.(Pune News)

यामध्ये सहभागी सर्व सदस्य शेतकरी ट्रेकर, गिर्यारोहक आहेत. स्थानिक गिर्यारोहक स्टेन्झिन नोर्ब्रू यांनी मोहिमेचे मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. कांगयात्से 2 हे लद्दाख हिमालयाच्या झंस्कार पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे. मार्खा व्हॅली व हेमीस राष्ट्रीय उद्यान क्षेत्रात असलेल्या या हिमाच्छादित शिखराची उंची 6250 मीटर (20,600 फुट) आहे. आफ्रिका खंडातील किलिमंजारो व युरोप खंडातील माऊंट एलब्रुस या सर्वोच्च शिखरांहून अधिक उंच व आव्हानात्मक असलेले हे शिखर गिर्यारोहकांसाठी नेहमीच एक आव्हान ठरलेले आहे.

राज्य शासनाला सादर होणार अहवाल

दरम्यान, या मोहिमेत सहभागी शेतकरी गिर्यारोहकांनी मार्खा खोर्यातील पारंपरिक शेती पद्दतीचा मोहिमेदरम्यान तौलानिक अभ्यास केला असून त्यातून पुढे आलेली महत्वपूर्ण माहिती व निष्कर्षांचा सविस्तर अहवाल राज्य शासनाच्या कृषी विभागास सादर करण्यात येणार आहे. हा अहवाल महाराष्ट्राच्या डोंगरी भागातील सेंद्रीय व नैसर्गिक शेती विकासासाठी महत्वपूर्ण ठरू शकेल, असा विश्वास निलेश खोकराळे यांनी व्यक्त केलाय.(Pune News)

शेतकरी तरुणांनी स्थापन केली शिवनेरी ट्रेकर्स संस्था

शिवनेरी ट्रेकर्स असोसिएशन ही जुन्नरमधील शेतकरी तरुणांनी स्थापन केलेली ट्रेकिंग, गिर्यारोहण, ट्रायथलान, शोध व बचावकार्य अशा साहसी क्रिडा कौशल्य संबंधित स्वयंसेवी संस्था असून या संस्थेमार्फत दरवर्षी शिवजयंती निमित्त जुन्नर येथे राज्यस्तरीय शिवनेरी मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. राज्य शासनासह जुन्नरमधील सर्व संस्था संघटनांचा त्यात सक्रिय सहभाग असतो.(Pune News)

News Title- Pune News Shivneri trekkers hoisted tiranga at Kangyatse

महत्वाच्या बातम्या-

‘मोठ्ठ्या ताई, तुम्ही आता आयुष्यभर…’; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळेंना झापलं

माघार की नवा डाव?; बारामती विधानसभेबाबत अजित पवारांचा धक्कादायक निर्णय

लाडक्या बहिणींना वेळेआधीच पैसे!, मंत्री अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

‘या’ विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ’31ऑगस्टपर्यंत करा अर्ज

कोलकाता ‘निर्भया कांड’वर आयुष्मान खुराणाची पोस्ट; व्हिडिओ पाहून तुमचंही मन सुन्न होईल