मोठी बातमी! पुण्यात एसटी बसचा भीषण अपघात, 30 प्रवासी जखमी

Pune News | पुणे जिल्हा आणि पुणे शहरात अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. याआधी पोर्शे प्रकरण मिटता मिटता नाकी नऊ आले आहेत. अशातच काल परवा आमदाराच्या पुतण्याने दोघांना कारने उडवल्याची माहिती समोर आली होती. अशात आणखी एक अपघाताची बातमी समोर आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत येथे धक्कादायक घटना घडली आहे. पुणे-सोलापूर बस एका झाडाला धडकली असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात जवळ जवळ 30 प्रवासी जखमी झाले आहेत. (Pune News)

जखमी असलेल्यांची प्रकृती चिंताजनक

जखमी असलेल्यांची प्रकृती ही चिंताजनक आहे. तर त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही बस पंढरपूरहून मुंबईकडे निघाली होती. मात्र पुणे जिल्ह्यात पुणे-सोलापूर महामार्गावर तिचा अपघात झाला. यावेळी स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू ठेवलं आहे. (Pune News)

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर जखमींना लोणी काळभोर येथे खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. झाडाची अवस्था पाहता अपघाताचा अंदाज लावता येतो. यामध्ये बसचा चेंदामेंदा झाल्याचं दिसून येतं. (Pune News)

अपघाताचं सत्र थांबेना

एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असं ब्रीदवाक्य घेऊन एसटी फिरत असते. परिवहन महामंडळाच्या बसला नागरिकही लाल परी म्हणून पसंती देतात. मात्र आता बस अपघातातही वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. या बस अपघातांना बसची झालेली दुरावस्था देखील करणीभूत असते. (Pune News)

News Title – Pune News ST Bus Accident At Pune District

महत्त्वाच्या बातम्या

“माझ्या पुतण्यानं मद्यप्राशन…”; आमदार मोहिते पाटलांचा मोठा दावा

‘या’ 3 राशींचं नशीब पालटणार; मिळणार बक्कळ पैसा

पुण्यात आणखी एक भीषण अपघात, आमदाराच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं

लग्नासाठी सोनाक्षी सिन्हा हिंदू धर्म सोडणार?, होणाऱ्या सासऱ्याने स्पष्टच सांगितलं

“जंग लगी तलवार पर धार लगानी होगी, कुछ लोग अपनी औकाद…”; छगन भुजबळांचं जोरदार भाषण