Pune News | सध्या मान्सूनचा हंगाम आहे. मान्सून हा आता राज्यभरात पोहोचला आहे. अशातच आता कोकणभागातील वरंधा घाट हा मान्सूनमुळे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे मार्गे कोकणात जाण्यासाठी वरंधा घाटाचा अनेकजन मार्ग अवलंब करताना दिसत आहेत. भोर तालुक्यातून महाडला जाण्यासाठी वरंधा घाटाचा वापर केला जातो. मात्र येत्या काही दिवस केवळ मान्सूनमुळे वरंधा घाट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोकणात जाण्यासाठी वरंधा घाटाचा मार्ग
पुण्याहून (Pune News) कोकणातील महाडमध्ये जाण्यासाठी वरंधा घाटाचा मार्ग निवडला जातो. हा मार्ग वाहतुकीकरता बंद करण्यात आला आहे. दुसरीकडे हवामान खात्याचा रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामळे वरंधा घाटात मोठ्या प्रमाणात वाहनांची बंदी घालण्यात आली आहे. पावसाळ्यात घाटामुळे अतिवृष्टी झाल्याने दरड कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरूपाच्या घटना घडतात. हा प्रकार बंद होण्यासाठी हा घाट बंद करण्यात आला आहे.
पुण्याचे (Pune News) जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी काही दिवस वरंधा घाट बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. आठवड्यापूर्वी वरंधा घाटातील वाघजाई मंदिराजवळ दरड कोसळल्यानं घाटातील संरक्षक कठडा तुटून रस्ता खचल्याची घटना घडली आहे. या घाटाचा पुणे (Pune News) हद्दीतील नागमोडी वळणाचा रस्ता आहे. याठिकाणी अनेकदा अतिवृष्टी झाल्याचं दिसून आलं आहे.
या घाटात मान्सूनमध्ये अनेकदा दरड कोसळणे, रस्ता खचल्याने नैसर्गिक हानी आणि जिवीत हानी झाल्याचं दिसून आलं आहे. अशा स्वरूपाच्या घटना घडत आहेत. त्यामुळे संभाव्य जीवित आणि वित्त हानी टाळण्याच्या उद्देशाने हा घाट रस्ता अवघड वाहनांसाठी पावसाळ्यात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Pune News)
वरंधा घाट बंद असल्याने पर्यायी मार्ग
पुण्यातून कोकणात जाण्यासाठी वरंधा घाटाचा मार्ग वापरावा. हा घाट शॉर्टकट आहे. यामुळे आता वाहनधारकांना पर्यायी मार्ग राजेवाडी फाटा-माणगाव-निजामपूर रोड-ताम्हाणी घाट-मुळशी पिरंगुट पुणे आणि पोलादपूर आंबेनळी घाट वाई मार्गे पुणे असा मार्ग आपण वापरू शकता.
पुण्यातून कोकणभागात अनेक पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जात असतात. त्यावेळी पुण्यातून कोकणात जाण्यासाठी वरंधा घाटाचा वापर करतात. मात्र अतिवृष्टीमुळे होणाऱ्या धक्कादायक घटनेमुळे घाट बंद करण्यात आला आहे. यामुळे कोणतीही नैसर्गिक आणि जीवित हानी होऊ नये, यासाठी पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली.
News Title – Pune News Varandha Ghat Close News Update
महत्त्वाच्या बातम्या
विधानसभेच्या ‘या’ 8 आमदारांनी दिले आमदारकीचे राजीनामे! नार्वेकरांनी दिली माहिती
स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मेगा भरती, पगारही मिळणार भरभक्कम; लगेच करा अर्ज
मोठी बातमी! चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला
HDFC बँकेने ग्राहकांना दिला झटका; ‘या’ सेवेत होतोय मोठा बदल
सतर्क राहा! हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा