पुण्यात चाललंय तरी काय?, 12 तासात रंगला दुसऱ्या खुनाचा थरार

Pune News | पुण्यात गेल्या काही दिवसात गुन्हेगारी वाढत असताना दिसत आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. काल रात्री (01 स्पटेंबर) रोजी पुण्यातील राष्ट्रवादी काँंग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून करण्यात आला, त्यामुळे शहरात रात्रीपासूनच तणावाचं वातावरण आहे. दरम्यान, या प्रकरणाला 12 तास पूर्ण होण्याच्या आधीच पुण्यात अणखी एका व्यक्तीची हत्या झाली. त्यामुळे संपूर्ण शहर हादरलं.

काय आहे प्रकरण?

पुण्यात (Pune News) गजबजलेल्या परिसरात (01 स्पटेंबर) रोजी रात्री 10 च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली. मात्र, या घटनेला 12 तास पूर्ण होत नाही तोच पुण्यातील एका फायनान्स कंपनीत मॅनेजर म्हणून असलेल्या व्यक्तीची हत्या झाली त्यामुळे शहरात भीतीचं वातावरण झालं आहे.

नक्की काय घडलं?

पुण्याच्या (Pune News) फायनान्स कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करणारे वासुदेव कुलकर्णी हे हडपसर येथे राहत होते. रात्री ते घरासमोर शतपावली करत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाले. यावेळी त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं. वासुदेव कुलकर्णी हे पुण्यातील एक प्रतिष्ठित फायनान्स कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होते.

कुलकर्णी यांच्या खुनाचं कारण?

रात्री घडलेल्या घटनेनंतर पुणेकर सावरत नाही, तोच दुसऱ्या हत्येची बातमी समजताच सगळीकडे एकच खळबळ उडाली. कुलकर्णी यांच्या खुनाचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र, पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतलं असलं तरी, अद्याप कोणाला अटक केलेली नाही.

News Title : pune news vasudev kulkarni murder at hadapsar

महत्त्वाच्या बातम्या-

वनराज आंदेकर हत्या प्रकरणात पोलिसांना संशय, मोठी माहिती समोर

सणासुदीत सोने-चांदी स्वस्त होणार की महागणार? जाणून घ्या आजचा तोळ्याचा भाव

विधानसभा तोंडावर असतानाच अजित पवारांच्या अडचणीत वाढ!

माजी नगरसेवक वनराज आंदेकरांच्या हत्येप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर!

ऐन सणासुदीत महागाईचा भडक, भाजीपाल्याचे दर पोहोचले शंभरी पार