Pune News | नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत भटक्या कुत्र्यांनी अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा तुकडा खात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मात्र या व्हिडिओतील कुत्र्याच्या तोंडात आणि परिसरात असलेले मांसाचे तुकडे नसून मोठे पाव आहेत, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. (Pune News )
आयुक्तांकडे तक्रार दाखल-
या प्रकरणी दत्तवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते अभिजित बारवकर यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. वैकुंठ स्मशानभूमीत भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणीही बारवकर यांनी केली आहे.
काय घडले नेमके?
वैकुंठ स्मशानभूमीत बुधवारी सकाळी काही नागरिक आपल्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेले होते. तेव्हा काही भटकी कुत्री जळालेल्या मृतदेहाच्या जवळ काहीतरी खात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घाबरलेल्या नागरिकांनी बारवकर यांना ही माहिती दिली. बारवकर यांनी या घटनेचे चित्रीकरण केले आणि आयुक्तांकडे तक्रार दाखल केली.
पालिकेचा दावा काय?
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने घटनास्थळी पाहणी केली. कुत्र्यांच्या तोंडात असलेले तुकडे हे मृतदेहाचे नसून पाव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Pune News )
वैकुंठ स्मशानभूमीवरील ताण
पुणे महापालिका क्षेत्रात शवदहनासाठी विविध यंत्रणा उपलब्ध आहेत. त्यामध्ये नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीचा वापर सर्वाधिक होतो. यामुळे वैकुंठ स्मशानभूमीवर प्रचंड ताण येत आहे. (Pune News )
News Title : Pune News Video of stray dogs at Vaikunth crematorium sparks outrage
महत्वाच्या बातम्या –
“धनंजय मुंडे यांच्या नोकराने जमीन हडपली”; महिलेच्या नव्या आरोपांनी खळबळ
चार्जिंगचं टेन्शन विसरा, आता बिनधास्त घ्या ई-कार; सरकारची मोठी घोषणा
बीड जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक घटना, पोलिसानं उचललं टोकाचं पाऊल
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पात्रता फेरीतील धक्कादायक प्रकार उघडकीस
मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?