Pune News | पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर (Swargate ST Stand) एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास, फलटणला जाणाऱ्या एका तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बस थांबली असल्याचे सांगून आरोपीने केली फसवणूक
पीडित तरुणी पुण्याहून (Pune News) फलटणला (Phaltan) जाण्यासाठी स्वारगेट एसटी स्थानकात पोहोचली होती. त्याच वेळी, एका अनोळखी व्यक्तीने तिला तिची बस दुसरीकडे थांबली असल्याचे सांगितले. या संधीचा फायदा घेत आरोपीने तिला डेपो परिसरात उभ्या असलेल्या बंद शिवशाही बसमध्ये नेले. बसमध्ये आत गेल्यावर, तो देखील तिच्या मागोमाग बसमध्ये शिरला आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला.
या भयंकर घटनेनंतर, तरुणीने स्वतःला सावरत फलटणला जाणाऱ्या बसमध्ये बसून तिच्या परिचिताला फोन केला आणि घडलेली घटना सांगितली. परिचिताने तिला तातडीने स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला. पोलिसांनी तक्रार दाखल करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपीची ओळख पटवली. आरोपीचा शोध घेण्यासाठी आठ पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच, या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पीडितेवर ससून रुग्णालयात उपचार सुरू
घटनेनंतर पीडित तरुणीला तातडीने ससून रुग्णालयात (Sassoon Hospital Pune News) दाखल करण्यात आले असून, तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह स्वारगेट एसटी स्थानक हे पुण्यातील सर्वात वर्दळीचे ठिकाण असून, तिथे अशा प्रकारची घटना घडल्याने महिला सुरक्षेचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Pune News: या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, पोलीस प्रशासन आणि सरकार यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी दबाव वाढला आहे.
English Title: Pune News Woman Raped in Shivshahi Bus at Swargate ST Stand