Pune News | सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे. अशातच पुणे शहरात झिका व्हायरसचं सावट आहे. यासोबतच आता आणखी एका रोगाने पुणे शहरात थैमान घातलं आहे. पुणे शहरात झिका व्हायरस सोबत आता डेंग्यूचं सावट असल्याचं दिसून आलं आहे. यामुळे आता रूग्णांची डोकेदुखी वाढली आहे. झिकाची रूग्णसंख्या ही 25 वर गेली असल्याचं दिसून आलं आहे. त्यापैकी 23 रूग्ण हे पुणे शहरात आढळून आल्याचं दिसून आलं आहे. (Pune News)
पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात झिका व्हायरस पसरतोय
पुण्यानंतर आता संगमनेर आणि कोल्हापूर येथे एक-एक रूग्ण आढळला आहे. झिका व्हायरसचा गर्भवती माता आणि तिच्या गर्भाला जास्त धोका असल्याने त्यांच्या तपासणीवर आरोग्य विभागाने भर दिला आहे. झिकाच्या एकूण रूग्णांपैकी सर्वाधिक प्रमाण हे गर्भवती मातांचे आहे. (Pune News)
झिका व्हायरससह शहरात डेंग्यूच्या रूग्णसंख्येतही मोठी वाढ दिसून येत आहे. या जुलै महिन्यात डेंग्यूचे 216 रूग्ण आढळले असून त्यातील 156 रूग्ण हे या आठवडाभरातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून डास असणाऱ्या जागा शोधून त्या नष्ट करण्याचं काम सुरू असल्याचं दिसून आलं आहे. डेंग्यूच्या रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. यापार्श्वभूमीवर काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.
पुणे शहरात (Pune News) जून महिन्यापासून झिका व्हायरसचा शिरकाव झाला आहे. जून महिन्यातच पहिला शिरकाव झाला असल्याचं दिसून आलं. जून महिन्यात झिका व्हायरसची रूग्णांची संख्या ही 21 वर पोहोचली असून त्यामध्ये 10 गर्भवती मातांचा समावेश आहे. गर्भवतींसाठी हा व्हायरस म्हणजे धोक्याची घंटा आहे.
सासवड आणि मूळशीतील भूगाव येथे झिका व्हायरसचा एक-एक रूग्ण आढळला आहे. गर्भवती महिलांना याचा धोका असल्याने गर्भवती महिलांच्या चाचण्या करण्यासाठी पालिकेकडून भर दिला जात आहे. पुणे शहरात जुलै महिन्यात डेंग्यूचे 216 रूग्ण आहेत. त्यातील 5 रुग्णांचे निदान करण्यात आलं असून 1 रूग्ण आहे. जानेवारी 2024 ते मे 2024 या काळात दर महिन्याला संशयित रूग्णांची संख्या ही 100 पेक्षा कमी होती. जानेवारी महिन्यात 96, फेब्रुवारी महिन्यात 75, मार्च महिन्यात 64, एप्रिल महिन्यात 51 आणि मे महिन्यात 44 अशा पद्धतीने रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. (Pune News)
झिका व्हायरससह डेंग्यूचे प्रमाण वाढले
अशातच आता सध्या पावसाळा ऋतू आहे. झिकानंतर आता शहरात डेंग्यूचे प्रमाण वाढलं आहे. झिका व्हायरसनंतर शहरात वर्षभरात डेंग्यूचे 703 संशयित रूग्ण आढळले असून, तर निदान झालेले 15 रूग्ण आहेत.
News Title – Pune News Zika Virus After Dengue Virus In Pune
महत्त्वाच्या बातम्या
मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता, यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी
संभाजी राजेंवर गुन्हा दाखल होणार?, मोठी माहिती आली समोर
राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणेस विरोध करणारे शंकराचार्य उद्धव ठाकरेंना भेटणार!
‘या’ 5 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, धनलाभाचे संकेत
मोठी बातमी! ‘त्या’ आरोपांनंतर छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला, राजकारणात खळबळ