Pune News | राज्यातील पुणे शहरात झिकाचे रुग्ण वाढतच चालल्याचे चित्र आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणखी 9 जणांना याची बाधा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आता बाधित रुग्णांची संख्या ही 52 वर पोहोचली आहे. यामुळे (Pune News) चिंता व्यक्त केली जात आहे.
आतापर्यंत शहरातील झिकाचा संसर्ग झालेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या 4 जणांच्या मृत्यूंचे परीक्षण सार्वजनिक आरोग्य विभागाची (Pune News)समिती करणार आहे. यानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. अशात पुण्यात अजून दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यात रुग्णांचा आकडा 52 वर
मृत्यूनंतर प्राप्त झालेल्या रुग्णांच्या नमुन्यांचा झिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मृत रुग्णांमध्ये कोथरूड मधील 68 वर्षीय, तर बाणेर येथील 78 वर्षीय वृद्धाचा (Pune News)समावेश आहे. यापूर्वी देखील दोन व्यक्तींचा झिकामुळे मृत्यू झाल्याचा संशय आहे.
त्यामुळे चारही संशयित मृत्यूंचे अहवाल पुनरावलोकनासाठी राज्य शासनाच्या समितीकडे पाठवण्यात आले आहेत. यापैकी एका रुग्णाचा मृत्यू हा 22 जुलैरोजी झाला होता. या रूग्णाला ताप आणि उलट्या अशी लक्षणे दिसून आली होती. त्याचे रिपोर्ट हे 31 जुलैरोजी मिळाले. त्यात हा रुग्ण झिका पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.
तर, दुसऱ्या मृत रुग्णाचे नमुने 21 जुलै रोजी एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याला 21 तारखेला दाखल करण्यात आले होते. मात्र, 26 जुलैरोजी त्याचा मृत्यू झाला.या रुग्णाचे रिपोर्ट हे 30 जुलैरोजी प्राप्त झाले. त्यातही हा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला. तर, अजून दोन मृत रुग्णांच्या रिपोर्टबद्दल अद्याप तपास सुरू आहे.
झिका व्हायरसची लक्षणे काय आहेत?
– सौम्य ताप येणे.
– शरीरावर पुरळ उठणे
– डोळ्यात लालसरपणा येणे.
– स्नायू आणि सांधेदुखी
– डोकेदुखी (Pune News)
News Title – Pune News zika virus patients 52
महत्त्वाच्या बातम्या-
“सरकार आता ‘माझा लाडका घोडा’ योजना आणतंय, मग कुत्रे..”; जितेंद्र आव्हाड यांनी डिवचलं
सर्वसामान्यांना दिलासा! टोमॅटोचे दर अर्ध्यावर, पण इतर भाज्या कडाडल्या
आज शनिदेव ‘या’ राशींवर असणार मेहेरबान; मोठा धनलाभ होणार
लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर करण्यात अदिती तटकरेंचं रायगड आघाडीवर!