घाईघाईची कर्जमाफी एका अधिकाऱ्याच्या जीवावर, दुसरा आयसीयूत!

पुणे | घाईघाईने केलेली शेतकरी कर्जमाफीमध्ये अनेक त्रुटी असल्याचं समोर आलंय. मात्र आता हा निर्णय अधिकाऱ्यांच्या जीवावर उठलाय. 

कर्जमाफीच्या कामाच्या तणावामुळे एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचा तर दुसरा अधिकारी आयसीयूत असल्याचा दावा करण्यात आलाय. राजपत्रित अधिकाऱ्यांनी हा दावा केलाय. 

अधिकाऱ्यांवर आलेल्या कामाच्या ताणाचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांची उद्या तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. पुण्यात ही बैठक पार पडणार आहे. 

दरम्यान, याप्रकरणी सहकार मंत्र्यांना भेटणार आहोत. तसेच गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांपर्यंत जाणार आहोत, असं राजपत्रित अधिकारी संघटनेचे अध्यक्ष ग. दि. कुलथे यांनी सांगितलं.