पुणे | ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ‘पीएमपीएमएल’ बसच्या 584 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
10 मिनिटांऐवजी आता 20 मिनिटानी बस स्टॉपवर बस येणार आहे. गर्दीतून होणारा संसर्ग रोखण्यासाठी हा उपाय योजण्यात आला आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीएल बसच्या दररोज 1800 पेक्षा जास्त फेऱ्या होतात. मात्र बस वाहतुकीच्या माध्यमातून ‘कोरोना’ विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी ही संख्या एक हजारच्या आत आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
दरम्यान, बसच्या 584 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. पहिल्या 24 तासात प्रवासी संख्या 12 लाखांवरुन 9 लाखांवर आली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
कोरोनाचा धोका ऑगस्ट महिन्यापर्यंत; डोनाल्ड ट्रम्प यांचा अंदाज
पुण्यात आणखी एक कोरोनाग्रस्त, ‘फ्रान्स रिटर्न’ महिलेला लागण
महत्वाच्या बातम्या-
कोरोनाला पिटाळण्यासाठी कैदीही झाले सज्ज; तयार करणार लाखो मास्क!
“गोगोईंकडून न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याच्या तत्वांशी तडजोड”
“आम्ही पण भारतीय, आम्हाला कोरोना म्हणणं बंद करा”; पाहा व्हिडीओ
Comments are closed.