प्रेमप्रकरणातून तरुणाने आत्त्याच्या मुलीवरच केले ब्लेडने वार

भोसरी | प्रेमप्रकरणातून तरुणाने आपल्याच आत्त्याच्या मुलीवर ब्लेडने वार केलेत. बुधवारी रात्री भोसरीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. 

दीपक गायकवाड नावाच्या आरोपीचं आत्त्याची मुलगी स्वप्नालीवर प्रेम होतं. स्वप्नालीचा विवाह झाला असून तिला दोन मुलंही आहेत. त्यामुळे मला भेटत जाऊ नकोस, असं तीनं दीपकला बजावलं होतं. त्या रागातून दीपकने स्वप्नालीवर ब्लेडने वार केले.

दीपकच्या हल्ल्यात स्वप्नाली किरकोळ जखमी झालीय. पोलिसांनी दीपकला ताब्यात घेतलं असून याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.