पुणे महाराष्ट्र

नियमबाह्य जमीन वाटप प्रकरणी पुनर्वसन अधिकाऱ्यांची चौकशी सुरु

पुणे | जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेतर्फे वाटप करण्यात आलेल्या जमिनींमध्ये गैरप्रकार झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात तथ्य अढळून आल्याने याबाबतच्या अनेक तक्रारी विभागीय आयुक्तांकडे दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्व प्रकरणाची दखल घेत विभागीय आयुक्तांनी याची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना दिले आहेत.

पुनर्वसन जमिनीचे नियमबाह्य पद्धतीने वाटप केल्या प्रकरणी 3 तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारींमध्ये तथ्य अढळून आल्याने जिल्हाधिकारी यांची विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे. तक्रारींचे स्वरुप पाहता विभागीय अधिकाऱ्यांनी ही चौकशी तातडीने व्हावी यासाठी 8 अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.

जिल्हाधिकाऱ्याकडून समिती स्थापन करुन काम सुरु करण्यात आलंय. अद्यापही काम पूर्ण झालेलं नाही. गैरप्रकाराच्या संदर्भात लोकप्रतिनिधींदेखील जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. काही संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले होते.

दरम्यान, जमीन वाटप गैरव्यवहार प्रकरणी तपासणी 8 अधिकाऱ्यांकडून सुरु आहे. यावरुन काही शे एकर पुनर्वसनाच्या जमिनींचे गैरप्रकारे वाटप जिल्हा पुनर्वसन कार्यालयातूनच झाले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

महत्वाच्या बातम्या-

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या