पुणे महाराष्ट्र

‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान पुणे पालिका हद्दीबाहेरील पीएमपी सेवा बंद

पुणे | मराठा आरक्षणासाठी आज राज्यात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. बंदरम्यान पुण्यातील पीएमपी बसचे काही मार्ग बंद करण्यात आले आहेत. 

बंददरम्यान शहरालगतच्या ग्रामीण भागातील बससेवा बंद कारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जवळपास 14 मार्गांवरील बस बंद करण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, शहरातील बस सेवा सुरळीत ठेवण्यात येईल. मात्र, त्यावेळी कुठे पीएमपीचे नुकसान झाले तर त्यामार्गावरील बससेवा सुरू ठेवायची की नाही याचा विचार करण्यात येईल असं पीएमपी प्रशासन अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 020-24503206 हा हेल्पलाईन क्रमांक पीएमपीने जारी केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मुंबईत मराठा मोर्चेकऱ्यांचा बंद की ठिय्या; संभ्रम कायम

-नको हत्या.. नको आत्महत्या, करु रक्तदान.. देऊ जीवदान; मराठ्यांचा अनोखा उपक्रम

-नंदुरबार बंद करण्यासाठी हर्षवर्धन जाधव मध्यरात्रीच नंदुरबारमध्ये दाखल

-#MaharashtraBandh | मराठा समाजाकडून ‘महाराष्ट्र बंद’ला सुरुवात

-नंदुरबारला निघालोय, बघू कुणात हिंमत आहे मराठा आंदोलन रोखायची?- हर्षवर्धन जाधव

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या