बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीसांचे तृतीयपंथीयाशी समलैंगिक संबंध असल्याचं म्हणणाऱ्याला अटक

पुणे | राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे एका तृतीयपंथीय व्यक्तिशी समलैंगिक संबंध असल्याचा आरोप एका तरूणाने केला होता. युवराज दाखले असं संंबंधित तरूणाचं नाव होतं. या तरूणाने एका व्हिडीओमधून धक्कादायक आरोप केले होते. या तरूणाला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी तृतीयपंथी व्यक्तीस खोटे आश्वासन देऊन त्यांच्याशी समलैंगिक संबंध ठेवले असल्याचा आरोप युवराज दाखले या तरूणाने केला होता.  पिंपरी-चिंचवड शहरातील तरूणाने व्हिडीओ बनवत हे आरोप केले होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना एका तृतीयपंथी व्यक्तीस खोटे आश्वासन देऊन त्यांच्याशी समलैंगिक संबंध ठेवले होते, असा आरोप या तरूणाने केला होता. त्यानंतर फडणवीसांची बदनामी होत असल्याचं लक्षात आल्यावर भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेश सदस्या कोमल रमेश शिंदे यांनी कार्यकर्त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दाखले या तरूणाला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, विधानसभेतही याचे तीव्र पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. यावर यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं.

थोडक्यात बातम्या-

मास्क का वापरायचा नाही याचं ठोस कारण राज ठाकरेंनी सांगावं- संजय राऊत

शाळेत जाण्यासाठी आईने केली बळजबरी, मुलाने केली पालकांचीच हत्या

धक्कादायक! अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं असलेल्या कारमालकाचा संशयास्पद मृत्यू

धनंजय मुंडेंच्या कारभाराने बीड जिल्ह्याची मान खाली – पंकजा मुंडे

‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌नवऱ्याने ‌व्हाॅटसअॅपला तिचा डीपी न ठेवल्याने पत्नीने केलं असं काही की….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More