पुण्यात रात्री घडला धक्कादायक प्रकार; महिला पोलिसावर पेट्रोल ओतलं..पुढं काय घडलं

Pune News l गेल्या काही दिवसांपासून विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात अत्यंत खळबळजनक घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी पोर्श कार अपघात व पबमध्ये ड्र्ग्सचा वापर होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे पुणे सध्या क्राईम घटनांमुळे चर्चेत आहे. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न :

पुणे येथील महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घ़डली आहे. पुणे शहारतील फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर काल रात्री 8 च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. मात्र त्यावेळी पोलिसांनी वेळीच सावधानता बाळगत आरोपीला रोखलं आहे. तसेच त्या महिला पोलिसाला देखील वाचवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

याप्रकरणी आरोपी संजय फकिरा साळवे या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपी संजय फकिरा साळवे हा मद्यपान करून नशेत धुंद असलेल्या आरोपीने हा धक्कादायक कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी संजय हा पिंपरी-चिंचवड येथे राहणारा आहे. मात्र आरोपीचं मूळ गाव हे जालना असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी संजय फकिरा साळवे याला अटक केली आहे.

Pune News l पोलिसांच्या सतर्कतेने मोठा नार्थ टळला :

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ड्रिंक अँड ड्राइव्हविरोधात परिसरात कारवाई सुरू होती. त्यावेळी महिला पोलिसाने तेथे आरोपी संजय याला अडवलं आणि त्यावेळी त्याची चौकशी सुरू केली. मात्र तेवढ्यात त्याने महिला पोलिसावर पेट्रोल आणि रॉकेल टाकत तिला जाळण्याचा धक्कादायक प्रयत्न केला.

मात्र त्यावेळी तिथे इतर पोलिस होते. त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला आणि सतर्कतने धाव घेत त्या आरोपीला रोखले आहे. तसेच महिला पोलिसाला देखील वाचवलं आहे. त्यामुळे इतर पोलिसांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला आणि महिला पोलिसाचाही जीव वाचला आहे. याप्रकरणी आरोपी संजय फकिरा साळवे याला पोलिसांनी बेड्या ठोक्या आहेत. तसेच त्याच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. तसेच आता याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

News Title – Pune Police Arrested A Drunk Man Who Tried To Set Fire On Woman Traffic Police In City

महत्वाच्या बातम्या-

ब्रेकिंग! खासदार रविंद्र वायकरांना क्लीन चीट; सर्व गुन्हे मागे

T20 वर्ल्डकपनंतर टीम इंडिया झिम्बाब्वेशी भिडणार, जाणून घ्या सामन्याची संपूर्ण माहिती

या राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता

परीक्षा न देता थेट बँकेत मिळवा नोकरी; ‘या’ पदांसाठी अर्ज झाले सुरू

‘एवढं लक्षात ठेवा’ अजित पवारांची भरसभेत कविता; जयंत पाटलांना हसू अनावर