महाराष्ट्र मुंबई

आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी केली अटक

मुंबई | नक्षलवाद्यांशी संबध असल्याच्या आरोपावरून मानवी हक्क कार्यकर्ते डॉ.आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी मुंबईत अटक केली आहे. पुणे न्यायालयानं तेलतुंबडे यांचा जामीन अर्ज शुक्रवारी फेटाळला होता.

कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचारात नक्षलवादी आणि सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांनी काही जणांना ऑगस्ट 2018 मध्ये अटक केली होती.

आनंद तेलतुंबडे यांनी या कारवाई विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयानं त्यांना कनिष्ठ न्यायालयात अर्ज करण्यास सांगितलं होतं.

दरम्यान, पुणे पोलीस आनंद तेलतुंबडे यांना पुणे न्यायालयात हजर करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

जयंत सिन्हांच्या मागे उभा राहिलेल्या या मुलीच्या वाकुल्या कुणासाठी??

-अर्थसंकल्प रद्द करा; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

पैसे मिळाले नाही म्हणून आम्हाला का विचारता; त्या कमळाबाईला विचारा ना – अजित पवार

गोयलांच्या घोषणेनंतर राहुल गांधींचा चेहरा पडला; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

…तर उदयनराजेंच्या विराेधात शिवसेना ताकदीनं लढणार- दिवाकर रावते

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या