पुणेकरांनो आत्ताच व्हा सावध; पुण्यात बनावट नोटांचा सुळसुटाळ

Pune News l पुणे पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून, दिल्लीहून आणलेल्या तब्बल साडेदहा लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली असून, या रॅकेटचे दिल्ली, गाझियाबाद आणि मुंबई कनेक्शन उघडकीस आले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:

निलेश वीरकर
सैफान पटेल
अफजल शाह
शाहिद जक्की कुरेशी
शाहफहड अन्सारी
या पाच जणांकडून पोलिसांनी १० लाख ३५ हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा झाला रॅकेटचा पर्दाफाश:

सहकारनगर पोलीस ठाण्याचे तपास पथक पद्मावती भागात गस्त घालत असताना, पोलिसांना पाहून एक व्यक्ती संशयास्पदरित्या पळू लागली. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५०० रुपयांच्या बनावट नोटांचे बंडल सापडले. चौकशीदरम्यान, त्याने शाहीद कुरेशी, सैफान पटेल आणि अफजल शाह यांनी त्याला या नोटा दिल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून नवी मुंबईतून शाहीदला अटक केली. शाहीदच्या चौकशीतून अन्सारीचे नाव समोर आले आणि पोलिसांनी त्यालाही अटक केली. अशाप्रकारे, एक-एक साखळी जोडत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आणि त्यांच्याकडून १० लाख ३५ हजारांच्या ५०० रुपयांच्या २ हजार बनावट नोटा जप्त केल्या.

दिल्ली आणि गाझियाबाद कनेक्शन:

या सर्व बनावट नोटा दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या रॅकेटमध्ये आणखी किती जण सामील आहेत आणि या बनावट नोटा कुठे-कुठे चलनात आणल्या जाणार होत्या, याचा तपास पोलीस करत आहेत.

News Title: Pune Police Bust Fake Currency Racket; Seize Counterfeit Notes Worth Rs 10.5 Lakh

महत्वाच्या बातम्या- 

सैफवरील हल्ल्यामागे शाहीदचा हात, पोलिसांच्या खुलाशाने खळबळ

सोनं खरेदी करणाऱ्यांना घाम फुटला; २४ कॅरेट ‘इतक्या’ हजारांच्या उंबरठ्यावर

14 दिवस मध खाल्ल्यास होतील ‘हे’ आश्चर्यकारक बदल

सैफनंतर शाहरुख खान टार्गेटवर?; ‘त्या’ सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना संशय

आधार कार्डवर मिळतं 2 लाखांचं कर्ज; जाणून घ्या संपूर्ण माहिती…