Pune l विद्येचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. नुकतच पुण्यातील L3 बार पार्टीमध्ये ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. पुण्यातील नामांकीत अशा FC रोडवरील बारमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील गंभीर दखल घेत बारवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
पुण्याच्या आयुक्तांनी दिला सज्जड दम :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारवाईनंतर पुण्यातील अनधिकृत पब आणि बारवर आता तोडक कारवाई होत असल्याचे पाहायला मिळत आहे. L3 बार पार्टीमध्ये ड्रग्ज घेणाऱ्या तरूणांसह मॅनेजर आणि काही वेटर यांना पोलिसांनी अटक देखील केली गेली आहे. या प्रकरणामुळे पुण्यातील प्रशासन व्यवस्थेवर जोरदार टीका करण्यात आली आहे.
अशातच आता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एक पाऊल पुढे जाऊन आमची काय दादागिरी असते ते दाखवून देवू असं म्हणत एकप्रकारे सज्जड दमच दिला आहे. पुण्यातील कोणत्याही परिसरात दारू, अमली पदार्थ विकले आणि पोलिसांच्या विरुद्ध भांडले तर आम्ही देखील कायदेशीरपणाने भांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Pune l पुण्यात जातीय सलोखा देखील टिकला पाहिजे :
याशिवाय पुण्यामध्ये काही विपरीत करण्याचा प्रयत्न केला तर कठोर कारवाई होणार, याशिवाय कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही जातीय सलोखा देखील टिकला पाहिजे असं पुणे आयुक्त म्हणाले आहेत. तसेच आयुक्त म्हणाले की, पोलिसांचा संयम आहे तो पर्यत संयम… एकदा का संयम सुटला की दोषींवर कडक कारवाई करणार आहोत.
सर्वात महत्वाचं म्हणजे अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने आपणही आपल्या मुला मुलींवर लक्ष ठेवा, असं आवाहन देखील पुणे आयुक्त अमितेश कुमार यांनी नागरिकांना केलं आहे. दरम्यान आता पुणे L3 बार पार्टी प्रकरणात आता एन डी पी एस कलम अन्वये गुन्हा दाखल देखील करण्यात आला आहे.
News Title – Pune Police Commissioner Amitesh Kumar In Action Mode After Drug Case
महत्त्वाच्या बातम्या-
देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या पराभूत उमेदवारांना दिल्या ‘या’ महत्वपूर्ण सूचना
लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली; तात्काळ रुग्णालयात केलं दाखल
या राशीच्या व्यक्तींना उत्पन्नाची नवीन संधी मिळेल!
दिल्लीत निलेश लंकेंनी घेतली नितीन गडकरींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार भारत vs पाकिस्तानचा हायव्होल्टेज सामना