बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केस कापण्यासाठी गेलेल्या लहान मुलीसोबत धक्कादायक प्रकार; एकाला अटक

पुणे | केस कापण्यासाठी गेलेल्या एका आठ वर्षाच्या मुलीसोबत केस कापणाऱ्या व्यक्तीनं अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये हा प्रकार समोर आला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आठ वर्षीय मुलगी आपल्या आजीसोबत पिंपरी चिंचवडमधील चिखली परिसरातील एका सलूनमध्ये केस कापण्यासाठी गेली होती. मुलीचा हेअर कट करण्यासाठी आरोपीनं तिला खुर्चीत बसवलं. हेअरकट करत असताना त्याने त्या मुलीसोबत अत्यंत चुकीच्या पद्धतीचं वर्णन केलं असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

मोहम्मद शेबु मोहम्मद हानिफ सलमानी असं आरोपीचं नाव आहे. संबधित आरोपी थ्री स्टार नावाच्या सलूनमध्ये काम करत होता. हेअरकट झाल्यानंतर मुलगी आजीसोबत घरी आली. त्यानंतर तिनं घडलेला सर्व प्रकार तिच्या आईला व आजीला सांगितला.

पीडित मुलीच्या आईनं हा धक्कादायक प्रकार ऐकल्यानंतर चिखली पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असल्याची माहिती पोलिस अधिकारी वसंत बाबर यांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक डी. एस. मुंडकर करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

कंगना राणावतच्या अडचणीत वाढ; ‘ते’ वादग्रस्त वक्तव्य भोवलं, आता…

“हे आंदोलन त्यांनी उभा केलंय, आता निर्णय देखील त्यांनीच घ्यावा”

नवाब मलिकांना मोठा दणका! मुंबई उच्च न्यायालयाने दिली ‘ही’ सूचना

‘या’ जिल्ह्यांनी देशाची चिंता वाढवली; कोरोना रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर

“या सर्वांना जबाबदार कोण? मोदी सरकार पूर्ण नापास”; भाजप खासदाराचे खडे बोल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More