तो आला, जामीन मिळवला आणि पोलिसांच्या हातावर तुरी देत पुन्हा फरार झाला!
पुणे | कुख्यात गुंड गजानन मारणेने पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या पोलिसांच्या हातावर तुरी देत वडगाव मावळच्या न्यायालयात जाऊन अटकपुर्व जामीन मिळवला आहे. संध्याकाळी चारच्या सुमारास तो न्यालालयामध्ये हजर झाल्याची माहिती समजत आहे.
तळोजा कारागृहातून सुटल्यावर मुंबईवरून पुण्याकडे येताना काढलेल्या जंगी रॅलीमुळे मागील आठवड्यात चर्चेत असलेल्या गजानन मारणेवर पुन्हा गुन्हा दाखल झाला होता. पुण्याकडे येताना एका लाईनमध्ये शेकडो आलिशान मोटरी आणि टोल नाका येथून विना टोल केलेला प्रवास त्यासोबत फूड मॉल येथे करण्यात आलेली दहशतीमुळे गजानन मारणेसह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र त्यानंतर गजनान मारणे फरार झाला होता.
गजानन मारणेच्या मागावर पुणे आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस होते. मात्र या दोन्ही पोलीस आयुक्तालयाच्या हातावर तुरी देत तो थेट वडगाव मावळच्या न्यायालयात हजर झाला आणि अटकपुर्व जामीन मिळवत तो पुन्हा फरार झाला. महत्वाची गोष्ट म्हणजे तो हैदोस घालतो फरार होतो त्यानंतर वडगाव मावळ न्यायालयात हजर होतो आणि जामीन मिळवून तो पुन्हा फरारा होतो अन् याची पोलिसांना अजिबात खबर लागत नाही ही मोठी शोकांतिका आहे.
दरम्यान, गजानन मारणेवर 15 फेब्रुवारीला बाहेर आल्यावर काढलेल्या जंगी मिरवणुकीवेळी माजवलेल्या उत्माताप्रकरणी पिंपरी-चिंचवड आणि पुणे पोलिसांनी अनेक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले होते. मात्र आता मारणे फरार झाल्याने पोलिसांसमोर त्याला पकडण्याचं मोठं आव्हान आहे.
थोडक्यात बातम्या-
नराधमाने तब्बल 66 जणींवर केला बलात्कार, अशा पद्धतीने महिलांवर ओढायचा आपल्या जाळ्यात!
पुणेकरांनो काळजी घ्या!; कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक
संजय राठोड यांच्याविरोधात तक्रार देण्याची हिम्मत दाखवणाऱ्या स्वरदा बापट कोण?, जाणून घ्या
“कोरोनाची लस भारतात कधी उपलब्ध होईल, मला कोणी सांगू शकेल का?”
पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांना हवं ते मिळालं, आता कारवाई होणार?
Comments are closed.