पुजा चव्हाण प्रकरणात भाजप नगरसेवकाला पुणे पोलिसांची नोटीस
पुणे | परळीच्या पुजा चव्हाण प्रकरण आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपलं आहे. भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे यांच्यावर संशय घेत त्यांना लॅपटाॅप परत आणून देण्याची नोटीस पुणे पोलिसांनी बजावली आहे. मात्र, पोलिसांच्या नोटीसमुळे चांगली खळबळ उडाली आहे. आम्हाला संशय आहे, लॅपटाॅप तुमच्याकडे आहे. तो लॅपटाॅप आपण आणून द्यावा असे नोटीस मध्ये म्हटलं आहे.
पुण्याच्या वानवाडी येथे पुजा चव्हाणचा जेव्हा इमारतीवरुन पडून मृत्यू झाला त्यावेळी भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे घटनास्थळी उभे होते. त्यावेळी घोगरे यांनी पुजा चव्हाणचा लॅपटाॅप आणि मोबाईल आपल्या ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र. घोगरे यांनी आज थेट पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणातील आपली भुमिका स्पष्ट केली आहे.
जिथे ही घटना घडली ते ठिकाण माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून तिथे पोहोचलो. तिचं नाव पुजा आहे हे देखील मला माहिती नव्हतं. तिला उचलून मी फक्त रिक्षात टाकलं आणि पोलिसांना पहिला फोन मीच केला. मोबाईल आणि लॅपटाॅपचं मला माहिती नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन सर्व गोष्टी ताब्यात घेतल्या, असं घोगरे म्हणाले.
दरम्यान, पुजा चव्हाणचा लॅपटाॅप धनराज घोगरे यांनी चोरल्याचा आरोप बीडच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या संगिता चव्हाण यांनी केला आहे. यासोबतच त्यांंनी धनराज घोगरे आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात बीड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र, काही दिवसांपुर्वी धनराज घोगरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
थोडक्यात बातम्या –
‘कोरोनाचा हा राक्षस…’; मुख्यमंत्र्यांनी कोकणच्या भराडी देवीकडे मागीतलं ‘हे’ साकडं
…म्हणून मी स्टंपच्या मागे मोठ्याने बडबड करतो, पंतने केला खुलासा, पाहा व्हिडीओ
‘तू काय ज्येष्ठ नागरिक आहेस का?’; कोरोनाची लस घेतल्यावर सैफ होतोय ट्रोल!
‘कुणाला लिव्ह ईन रिलेशनमध्ये मुलं होतात तर कुणाला…’; चंद्रकांत पाटलांचा सरकारवर निशाणा
…तर मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचं सत्य बाहेर येणार नाही- संजय राऊत
Comments are closed.