पुण्यातील भाई-दादांना संदीप पाटलांचा दणका; 11 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई

पुणे | पुण्यातील भाई-दादांची खैर केली जाणार नसल्याचं पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. ग्रामीण पोलिसांनी आणखी 11 भाई-दादांवर मकोका (जुना मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. 

दौंडमध्ये वाळू माफिया तसेच कुख्यात गुन्हेगारांसह 9 जणांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलीय. तर बारामतीत तीन जणांवर मकोका लावण्यात आला आहे. 

पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी स्वतः यासंदर्भात माहिती दिली आहे. संघटीत गुन्हेगारी कमी करण्यासाठी ही कारवाई आणखी तीव्र करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे भाई-दादांचे धाबे दणाणले आहेत. पुढचा नंबर आपला लागू नये यासाठी अनेक भाई-दादा शांत झाल्याचं दिसून येत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-…तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर कपडे राहिले नसते!

-…तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डमरु वाजवत होते का?- हार्दिक पटेल

-सत्य बोलल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नाकाला मिरच्या झोंबल्या!

-महेंद्रसिंग धोनीनं घेतलेल्या या कॅचची क्रिकेटविश्वात जोरदार चर्चा

-अरे यु डर्टी डर्टी गर्ल… सोशल मीडियावर सनी लिओनीच्या नव्या गाण्याचा धुमाकूळ

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या