७० वर्षीय वृद्धेकडून १ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त

संग्रहित फोटो

पुणे | पुण्यात ७० वर्षीय वृद्धेकडून १ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गीता शहा असं या महिलेचं नाव असून त्या इस्टेट एजंट आहेत.

गीता शहा नोटा बदलण्यासाठी एफसी रोडवर येणार असल्याची माहिती डेक्कन पोलिसांना मिळाली. शहा रिक्षातून उतरल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

दरम्यान, जप्त केलेल्या नोटा प्राप्तिकर विभागाकडे सोपवल्या जातील व त्यांच्याकडूनच पुढील चौकशी होईल, असं पोलिसांनी सांगितलं.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या