Top News पुणे महाराष्ट्र

संजय राठोड यांच्या चौकशीबाबत पुणे पोलिसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

पुणे | गेल्या आठवड्यापासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणामध्ये शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडलं जात आहे. सोशल माध्यमांवर काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे विरोधकांनीही हे प्रकरण लावून धरत संजय राठोडांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. अशातच पुणे पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीबाबत माहिती दिली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आवश्यकता असल्यास शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड यांची चौकशी करण्यात येईल. आम्ही या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असल्याचं असं पुणे पोलिसांनी सांगितलं आहे. त्यामुळे या प्रकरणात राठोडांची चौकशीही होऊ शकते.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील अरूण राठोड नावाच्या तरूणाला पोलिसांनी अटक केली असल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत मात्र पोलिसांनी कोणतीही माहिती दिली आहे. सोशल मीडियावर ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत त्यामध्ये अरूण राठोडने या तरूणीने कथित मंत्र्याशी संवाद साधल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, या प्रकरणात संजय राठोड यांनी पुढे येत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे राठोड संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी संजय राठोड यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलं आहे. मात्र राठोड यांनी यावर काहीही स्पष्टीकरण दिलं नाही आणि महत्त्वाचं म्हणजे राठोड हे प्रकरण समोर आल्यापासून गायब आहेत.

थोडक्यात बातम्या-

काही साप चावतात तर काही चावत नाही, त्यांना ठेचायचं असतं- उद्धव ठाकरे

ऐकावं ते नवलंच! गर्लफ्रेंडला प्रेग्नंट करून तिच्या आईसोबत बॉयफ्रेंडचं पलायन

अजितदादांच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी ‘ती’ भााषा शिकणार- उद्धव ठाकरे

गलवान खोऱ्यात ‘इतके’ सैनिक गमावले; चीनने पहिल्यांदा दिली कबुली

डाॅली की टपरी!!! सोशल मीडियावर आता या चहावाल्याचा जलवा, पाहा व्हिडीओ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या