बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे पोलिसांनी वर्षभरात तब्बल एवढ्या पुणेकरांवर केली मास्क न वापरल्याबद्दल कारवाई

पुणे | देशभरात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. 2020 पासून कोरोनाचं संकट भारतावर घोंगावत आहे. त्यातच दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात मात्र मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. वारंवार प्रशासनाकडून आवाहन करण्यात येऊनही बरेचसे नागरिक मास्क वापरत नसल्याचं आढळून येतंय.

गेल्या वर्षभरात पुणे पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई केली आहे. तब्बल 3 लाख 54 हजार 969 नागरिकांवर मास्क परिधान न केल्यामुळे पुणे पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्याने पुण्यातील नागरीकांचा बेजबाबदारपणा समोर आल्याचं पाहायला मिळत आहे.

यासंदर्भात पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज जवळपास दोन ते तीन हजार लोक पोलिसांना विना मास्क फिरताना आढळून येत आहेत. त्यांच्याकडून दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. वर्षभरात एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिसांकडून कारवाई झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मागच्या वर्षभरात मास्क न वापरलेल्या नागरिकांवर झालेल्या कारवाईतून पुणे पोलिसांना 17 लाख 85 हजार रुपयांचा दंड मिळाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात दंड वसूल झाल्याने पुणेकर आता तरी जागृत होऊन नियमांचं पालन करून मास्क वापरतील अशी अपेक्षा आहे.

थोडक्यात बातम्या –

श्रीलंका दौऱ्यात हार्दिक पांड्या भारताचा कर्णधार?, अजूनही एका नावाची चर्चा

दिलासादायक! मुंबईची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; कोरोनामुक्तीचा दर पोहोचला 92 टक्यांवर

कोरोना रुग्णांना हे इंजेक्शन देऊ नका, WHOनं भारताला दिला महत्त्वाचा सल्ला

दूरदृष्टी! कोविडकाळात व्हायरल होतोय अटल बिहारी वाजपेयींचा ‘हा’ व्हिडीओ

कोरोनावर प्रभावी औषध शोधल्याचा दावा, महाराष्ट्रातील सांगलीत उत्पादन सुरु

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More