बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ज्यांना बाहेर जायचंय त्यांनी खुशाल जा; फक्त… पुणे पोलिसांनी घातली ‘ही’ अट

पुणे | देशभरात कोरोना विषाणूचा धुमाकूळ सुरु आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने 3 मे पर्यंत लॉकडाउन वाढवला आहे. या काळात नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात पुणे शहरालाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे.

शहरात कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या पुणे पोलिसांनी सध्याच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांना एक आव्हान दिलंय.

ज्यांना या काळात घराबाहेर पडायचं आहे, त्यांनी खुशाल पडावं…मात्र त्याआधी रेड झोनमध्ये पोलिसांसोबत 6 तास ड्युटी करुन दाखवायची आहे मंजूर?? अशा आशयाचं ट्विट पुणे पोलिसांनी केलंय.

सध्याचं युग हे इंटरनेटचं युग आहे. या काळात पोलीस यंत्रणाही सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीया आहेत.

 

ट्रेंडिंग बातम्या-

मुस्लिम बांधवांना शुभेच्छा… रमजानमुळे समाजातील बंधुभाव अधिक दृढ होईल- उद्धव ठाकरे

दारू पिणाऱ्यांचं दु:ख राज ठाकरेंनी सरकार दरबारी मांडलं, व्वा ‘राज’बाबू व्वा…; संजय राऊतांचे शालजोडीतून टोले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More